आई, बाबा मतदान करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नागपूर : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकशाहीत मतदान हे महत्त्वाचे आहे. या मताच्या आधारेच जय-पराजय निश्‍चित होते.
मतदानाच्या बाबतीतदेखील लोकांच्या मनात कर्तव्यभावना निर्माण करणे आवश्‍यक आहे. विद्यार्थी पालकांचे ऐकतात, त्याचप्रमाणे पालकवर्गही विद्यार्थी, मुलांचे ऐकतात. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे. आई, बाबाला मतदान करण्यास प्रेरित करण्यासाठी संकल्पपत्र विद्यार्थ्यांनाकडून भरून घेण्यात येत आहे.

प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला हक्क बजावणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्याशिवाय आपली लोकशाही अधिक सक्षम होणार नाही. लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून "सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पारर्टीसिपेशन' (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शहर-ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेत, त्यांना पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. गत लोकसभा निवडणुकीतही ही संकल्पना राबविली होती.
गेल्या काही निवडणुकांमध्ये राज्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मतदानाची टक्केवारी हे सरासरीपेक्षा खालावत चालली असल्याचे चित्र आहे. ही मतदानाची टक्केवारी वाढावी. मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता नैतिक पद्धतीने मतदानाचा हक्क बजवावा. यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पालक मतदान करतील, असे संकल्पपत्र शालेय विद्यार्थी आपल्या पालकांकडून भरून घेतील. सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांकडून त्यांचे पालक आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील, असे संकल्पपत्र भरून घेतील. ग्रामीण भागात नोडल अधिकारी म्हणून जि. प.च्या पंचायत विभागाचे उपमुख्यकार्य अधिकारी राजेंद्र भुयार यांची नेमणूक केली आहे. तर शहरी भागासाठी मनपाच्या उपायुक्त रंजना लाडे यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विद्यार्थी आपल्या पालकांना पत्रही पाठविणार असल्याचे सांगण्यात येते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mom, Dad, vote