Monsoon Finally Enters Vidarbha After Delay
esakal
नागपूर : विदर्भातील बळीराजासह जनसामान्य ज्या क्षणाची चातकाप्रमाणे वाट पाहत होता, त्या मॉन्सूनने मंगळवारी विदर्भात धडाक्यात प्रवेश करीत आनंदसरी बरसल्या असून यावर प्रादेशिक हवामान विभागानेही अधिकृत शिक्कामोर्तब केले. गेल्या दहा वर्षांत विदर्भात दुसऱ्यांदा मॉन्सून उशिरा दाखल झाला आहे. मॉन्सूनच्या पावसाने पहिल्याच दिवशी उपराजधानीला चांगलेच भिजवले.