
वाशीम : पंधरा दिवसापेक्षा जास्त विश्रांती घेतलेला मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नदी, नाले ओसंडून वाहत असल्यामुळे तालुक्यात काही गावांचा संपर्क तुटला आहे. शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे.