Monsoon : विदर्भात मॉन्सूनचे पुढील आठवड्यात होणार आगमन

वातावरण अनुकूल, बळीराजासाठी आनंदवार्ता
monsoon
monsoonsakal

नागपूर - उन्हाळा अधिकृतरित्या संपला असून, आता वैदर्भीना नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनचे वेध लागले आहे. सध्या अनुकूल वातावरण असल्यामुळे मॉन्सूनच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. कोणत्याही अडथळ्याविना अशीच प्रगती यापुढेही कायम राहिली तर, विदर्भातही मॉन्सून निर्धारित तारखेपूर्वीच दाखल होऊ शकतो. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे बळीराजासाठी ही आनंदवार्ता आहे.

भारताचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या केरळमध्ये निर्धारित तारखेच्या दोन दिवसांपूर्वीच (३० मे) धडक दिल्यानंतर मॉन्सूनने दक्षिण कर्नाटक, आंध्रप्रदेश व तमिळनाडूही व्यापला आहे. पुढील वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण असल्यामुळे चार जूनपर्यंत तळकोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशीच वेगाने प्रगती कायम राहिल्यास महाराष्ट्र आणि विदर्भातही मॉन्सूनचे लवकर आगमन होण्याची दाट शक्यता आहे.

विदर्भातील आगमनाबाबत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, विदर्भात मॉन्सून दाखल होण्याची ‘नॉर्मल’ तारीख १५ जून आहे. परंतु यावर्षी केरळमध्ये दोन दिवस आधी मॉन्सून आल्याने विदर्भातही लवकर येऊ शकतो. मात्र त्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या आर्द्रता वाढू लागल्याने या आठवड्यात विदर्भात काही ठिकाणी मॉन्सूनपूर्व सरींचीही शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

जून महिन्यातील लक्षवेधी आकडेवारी

  • जून महिन्यात सर्वाधिक पाऊस : ५००.६ मिलिमीटर (१८८१ मध्ये)

  • २४ तासांत सर्वाधिक पाऊस : ३१५ मिलिमीटर (१२ जून १९११ रोजी)

  • सर्वाधिक कमाल तापमान : ४७.६ अंश सेल्सिअस (५ जून २००३ रोजी)

  • सर्वात कमी किमान तापमान :२० अंश सेल्सिअस (१८ जून २००३ रोजी)

यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस

भारतीय हवामान विभागाने यंदा संपूर्ण भारतात सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागातर्फे नुकताच दुसरा व अंतिम अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार, यावर्षीच्या मॉन्सूनवर ‘ला निना’चा अनुकूल प्रभाव असल्यामुळे काही राज्यांमध्ये तब्बल १०६ टक्क्यांपर्यंत पावसाची शक्यता आहे. विदर्भातही दमदार पावसाचा अंदाज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com