esakal | बघा, आयआयटीचे कोणत्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी परतणार...
sakal

बोलून बातमी शोधा

kota bus

राजस्थानमध्ये कोटा येथे आयआयटीचे शिक्षण घेणाऱ्या श्‍चिम विदर्भातील 190 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना परत आणण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा बस डेपोच्या 10 बस पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बघा, आयआयटीचे कोणत्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी परतणार...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्रातील 1764 विद्यार्थी विविध संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे हे विद्यार्थी तेथे अकडून पडले आहेत. त्यात पश्‍चिम विदर्भातील 190 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना परत आणण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा बस डेपोच्या 10 बस पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


कोणत्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी?
कोटा येथे पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील एकूण 190 विद्यार्थी अकडकले आहेत. त्यात अकोला जिल्ह्यातील 8, बुलडाणा जिल्ह्यातील 57, वाशीम जिल्ह्यातील 28, अमरावती जिल्ह्यातील 72 आणि यवतमाळ जिल्ह्यातील 25 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


अमरावतीच्या बसमध्ये येणार अकोल्याचे विद्यार्थी
कोट्यावरून महाराष्ट्रात परत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याकरिता 53 प्रवाशी बसण्याची व्यवस्था असलेल्या एका बसमध्ये 20 विद्यार्थीच बसविण्यात येणार आहे. त्यानुसार अकोला व अमरावती येथील 80 विद्यार्थ्यांकरिता चार बसचे नियोजन केले आहे.


बुलडाणा, वाशीमच्या विद्यार्थ्यांसाठी सहा बस
बुलडाणा आणि वाशीमसह यवतमाळ येथील 110 विद्यार्थ्यांसाठी सहा बसची व्यवस्था केली आहे. या तीन जिल्ह्यातील विद्यार्थी एकत्रपणे या सहा बसने महाराष्ट्रात परत येणार आहेत. 

आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनी दिले होते आदेश
राज्यातील जे विद्यार्थी कोट्यात अडकले आहेत, त्यांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी नियोजन करण्यासंदर्भातील सूचना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार राजस्थान सरकारला पत्र पाठवून विद्यार्थ्यांना परत आणण्यासंदर्भात व त्यांचे स्क्रिनिंग करण्याबाबतची व्यवस्था करण्यास सांगितले होते. 

रविवारपर्यंत परतणार गावी
कोटा येथून बसने महाराष्ट्रात परतणारे विद्यार्थी रविवारपर्यंत त्यांच्या घरी परतण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्य शासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे.