esakal | विदर्भवासीयांची चिंता वाढवणारी बातमी, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झाली वाढ

बोलून बातमी शोधा

corona patient

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर व यवतमाळ या जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण असतानाच शुक्रवारी सकाळी गोंदियातील एका संशयित व्यक्तीचा वैद्यकीय तपासणी अहवाल  पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. 

विदर्भवासीयांची चिंता वाढवणारी बातमी, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झाली वाढ
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : नागपुरातील कोरोनाचा रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी गेल्याची बातमी ताजी असतानाच शुक्रवारची सकाळ विदर्भवासीयांची चिंता वाढवणारी बातमी घेऊन आली. नागपूरमध्ये चार तर गोंदियात एका नव्या रुग्णाची भर पडली आहे. याचबरोबर विदर्भातील कोरोनाबाधितांची संख्या १४ वर पोहोचली आहे.

नागपूरच्या मेडिकल व मेयो रुग्णालयात एकूण पाच कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यापैकी एकाला गुरुवारी सुटी देण्यात आली. उर्वरित चारपैकी खामला निवासी एक रुग्ण दिल्लीहून परतला होता. त्याच्या संपर्कात आल्यामुळे त्याची आई़, पत्नी, मुलगा व एका मित्राला देखील कोरोना विषाणूची लागण झाल्याचा अहवाल मेयो रुग्णालयाच्या प्रयोगशाळेने शुक्रवारी दिला. या चौघांवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यवतमाळमध्ये आधीच चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या पाठोपाठ आता गोंदियात देखील एक रुग्ण सापडला आहे.

गोंदियात कोरोनाचा एक रुग्ण पॉझिटिव्ह
राज्यात मुंबई, पुणे, नागपूर व यवतमाळ या जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण असतानाच शुक्रवारी सकाळी गोंदियातील एका संशयित व्यक्तीचा वैद्यकीय तपासणी अहवाल  पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. 

खुशखबर, नागपुरातील कोरोनाचा रुग्ण झाला ठणठणीत, आईने दृष्ट काढून केले स्वागत

जिल्ह्यात २६ मार्चपर्यंत  १२९ जण विदेशातून प्रवास करून आले आहेत. या व्यक्तींच्या संपर्कात ६१३ व्यक्ती  आली आहेत. अशी एकूण ७४२ व्यक्ती आहेत. त्यापैकी एकूण ७४० व्यक्तींना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण करून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यापैकी ५ व्यक्तींचा वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असला तरी, आज शुक्रवारी आलेल्या अहवालात एका व्यक्तीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वीच थायलंडवरून गोंदियात परतली असून, गणेशनगरातील रहिवासी आहे. आता ही व्यक्ती आजवर कोणाच्या संपर्कात आली, याचा शोध जिल्हा प्रशासन घेत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी दिली.