more holidays on friday in 2021
more holidays on friday in 2021

२०२१च्या सर्वाधिक सुट्ट्या शुक्रवारलाच; तर दोन रविवारी; शासकीय कर्मचाऱ्यांचा हिरमोड

नंदोरी (जि. वर्धा) : लवकरच नवीन वर्ष 2021 ला प्रारंभ होत आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने नवीन वर्ष 2021 मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्यात. नवीन वर्षात 24 सार्वजनिक सुट्ट्या आहेत. या सुट्ट्यांत 2 सुट्ट्या रविवारी, तर 3 सुट्ट्या शनिवारी येत असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काच्या मिळणाऱ्या दोन सुट्ट्‌या रविवारी आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांचा काहीसा हिरमोड झाला. 

सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये व बँकांना देखील रविवारी सुट्टी, तर शनिवारी हाफ डे असतो. त्यामुळे शनिवार, रविवार म्हटले की या कर्मचाऱ्यांसाठी आठवड्‌यात कामापासून सुटका असते. या सुट्टीच्या दिवशी कर्मचारी विरंगुळा म्हणून छंद जोपासतात. काही आठवड्याची शिल्लक घरकामे जसे किराणा, घर स्वच्छता आदी तर काही पर्यटनाचा आनंद घेतात. त्यामुळे शनिवार, रविवार हे कर्मचाऱ्यांचे आवडीचे दिवस असतात. याशिवाय सण, उत्सव, राष्ट्रीय सण व स्थानिक प्रशासनाच्या सुट्टीकडे कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष असते. कार्यालयीन सुट्ट्यांचा ताळमेळ बसवून शासकीय कर्मचारी सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा बेत कर्मचारी आखत असतात. आता येत्या 2021 मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर झाल्याने शासकीय कर्मचारी सुट्यांच्या नियोजनात व्यस्स्त असणार हे खरे असले तरी सार्वजनिक दोन सुट्या रविवारी आल्याने काहीचा हिरमोडही झाला असणार.

2021 मधील शासकीय सुट्ट्‌या -

वार सण सुट्ट्या
बुधवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, बुद्ध पौर्णिमा, बकरी ईद 04
शुक्रवार छत्रपती शिवाजी महाराज जयंती, गुडफ्रायडे, गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी (बलीप्रतीपदा), गुरुनानक जयंती 06
मंगळवार  प्रजासत्ताकदिन, गुढीपाडवा, इद ए मिलाद- 03
सोमवार होळी, पारशी नववर्ष 02
गुरुवार महाशिवरात्री, रमजान ईद,मोहरम, दिवाळी (लक्ष्मी पूजन) 04
शनिवार महाराष्ट्र दिन, म. गांधी जयंती, ख्रिसमस 03
रविवार महावीर जयंती, स्वातंत्र्यदिन 02

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com