नगरपरिषदेच्या गच्चीवरील मटन पार्टी भोवली; अमरावती जिल्हाधिकाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांना नोटीस, दोन दिवसांत मागितला खुलासा

Morshi Meat Party : हा कार्यक्रम नेमका कोणाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता, त्याला कोणाची परवानगी होती आणि या कार्यक्रमाला कोणकोण उपस्थित होते, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
Morshi Meat Party

Morshi Meat Party

esakal

Updated on: 

अमरावती : मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या गच्चीवर शुक्रवारी (ता. १३) रात्री आयोजित करण्यात आलेल्या पार्टीचा व्हिडिओ समाज माध्यमांवरून व्हायरल झाल्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. पार्टी करणारे कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून मोर्शीत याविषयाची खमंग चर्चा रंगली आहे. नगरपरिषदेच्या गच्चीवर रात्रीच्या वेळी झालेल्या या पार्टीची माहिती शहरात पसरताच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शुक्रवारी रात्री आयोजित या पार्टीत शाकाहारी तसेच मांसाहारी, अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची व्यवस्था असल्याची चर्चा आहे. मात्र, हा कार्यक्रम नेमका कोणाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता, त्याला कोणाची परवानगी होती आणि या कार्यक्रमाला कोणकोण उपस्थित होते, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

Loading content, please wait...