Amravati News: मोर्शी नगरपरिषदेच्या गच्चीवर पार्टी, समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल, जिल्ह्यात खळबळ

Mor­shi Municipal Council Party : मोर्शी नगरपरिषदेच्या गच्चीवर आयोजित पार्टीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ; जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल घेत मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
A party held on the terrace of Morshi Municipal Council has triggered controversy after its video surfaced on social media

A party held on the terrace of Morshi Municipal Council has triggered controversy after its video surfaced on social media

esakal

Updated on: 

मोर्शी : मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या गच्चीवर शुक्रवारी (ता. १३) रात्री आयोजित करण्यात आलेल्या पार्टीचा व्हिडिओ समाज माध्यमांवरून व्हायरल झाल्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. पार्टी करणारे कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून मोर्शीत याविषयाची खमंग चर्चा रंगली आहे. नगरपरिषदेच्या गच्चीवर रात्रीच्या वेळी झालेल्या या पार्टीची माहिती शहरात पसरताच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शुक्रवारी रात्री आयोजित या पार्टीत शाकाहारी तसेच मांसाहारी, अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची व्यवस्था असल्याची चर्चा आहे.

Loading content, please wait...