यवतमाळ : विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू

शेतातील विहिरीतून पाणी काढत असताना तोल जाऊन मुलगी पाण्यात पडली. मुलीला वाचविण्यासाठी आईने थेट विहिरीत उडी घेतली; मात्र दुर्दैवाने दोघींचाही बुडून मृत्यू झाला.
well
wellesakal
Updated on

पांढरकवडा (जि. यवतमाळ) - शेतातील विहिरीतून पाणी काढत असताना तोल जाऊन मुलगी पाण्यात पडली. मुलीला वाचविण्यासाठी आईने थेट विहिरीत उडी घेतली; मात्र दुर्दैवाने दोघींचाही बुडून मृत्यू झाला. अंगावर शहारे आणणारी आणि तितकीच धक्कादायक घटना तालुक्यातील गवराई येथे रविवारी (ता. ५) घडली. कल्पना जयवंत बोपटे (वय ३०) व आदिती जयवंत बोपटे (वय ८) अशी मृतांची नावे आहेत.

केळापूर तालुक्यातील गवराई येथे आज कल्पना बोपटे दोन मुली आणि एक मुलगा यांना घेऊन सकाळी शेतात गेली होती. दुपारच्या सुमारास लहान मुलगी आदिती पाणी काढण्यासाठी विहिरीजवळ गेली. पाणी काढत असताना अचानकपणे तोल जाऊन ती थेट पाण्यात पडली. मुलगी पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे लक्षात येताच कल्पनाने मुलीला पाण्यातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

well
नागपूर : कृषी समिती बरखास्त करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा

मात्र, मुलगी पाण्यात खोलवर बुडत असल्याने तिने कसलाही विचार न करता पाण्यात उडी घेतली. पाणी खूप खोल असल्याने मायलेकी पाण्याच्या तळाशी गेल्या. विहिरीच्या काठावर उभे असलेले मुलगा आणि मुलगी यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र उशिरापर्यंत तेथे कोणीच न आल्याने दोघींचाही बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने दोघींचा मृतदेह पाण्याबाहेर काढून पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मायलेकीच्या जाण्याने गवराई गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com