पैशांच्या पावसासाठी युवतीला विवस्त्र केल्याचे प्रकरण : अघोरी कृत्यास भाग पाडणाऱ्या आईला अटक

Mother arrested for committing aghori act wardha news
Mother arrested for committing aghori act wardha news

वर्धा : ऐंशी कोटींचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून आईसह नातलगांनी पीडितेवर अघोरी कृत्य करून वर्षभरापासून शोषण केल्याची लज्जास्पद घटना तीन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याप्रकरणात पीडेतेच्या काकासह तिघांना अटक करण्यात आली होती. रामनगर पोलिसांनी पीडितेच्या आईला हिंगणघाट तालुक्यातील येरणगाव येथून अटक केल्याची माहिती आहे. आता आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे. पीडितेच्या आईला अटक झाल्याने या प्रकरणातील रहस्य उलगडण्याची शक्यता आहे.

अघोरी कृत्यातून पीडितेला विवस्त्र करीत गुप्तधन मिळविण्याच्या हव्यासापोटी पीडितेची आई, काकासह आणखी तिघांनी पीडितेचे वर्षभरापासून शोषण केले, असे बयाण स्वत: पीडितेनेच पोलिसांसमक्ष दिल्याने समाजमन सुन्न झाले. पोलिसांनी अंनिसच्या मदतीने बालू उर्फ प्रवीण मंगरूळकर आणि किशोर सुपारे यांना अटक केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी आरोपी प्रवीण पाटील आणि दीपक कांबळे यांना अटक केली होती.

रामनगर पोलिसांनी शनिवारी पीडितेच्या आईला अटक केली असून सर्व आरोपींची कारागृहात रवानगी केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विष्णू भांडवले यांनी दिली. विशेष म्हणजे पीडितेची आई आणि एक महिला या दोघी वर्धेतील शिवाजी चौकात असलेल्या हॉटेलमध्ये काम करीत होत्या. तेथूनच दोघांत मैत्री झाली. महिलेने पीडितेच्या आईला तुमच्या वरील कर्ज फेडायचे असेल तर आपल्याजवळ एक डीआर (मांत्रिक) आहे. तो पैशाचा पाऊस पाडतो असे सांगितले.

त्यानंतर ती महिला आणि पीडितेची आई पीडितेला घेऊन चंद्रपूर येथे गेल्या. तेथे डिआर येणार होता. पण, तो आला नाही. त्यामुळे तिघांनीही तेथेच मुक्काम केला. महिलेच्या संपर्कातून बालू उर्फ प्रवीण मंगरूळकर हा पीडितेच्या आईच्या संपर्कात आला. बालूने पीडितेच्या आईला डिआर काय करतो, पैशांचा पाऊस कसा पाडतो, हे सर्व समजावून सांगितले. पैशाच्या आमिषाने पीडितेची आई देखील याला तयार झाली. पीडितेवर वर्षभर विविध अघोरी कृत्य करण्यात आले. त्यामुळे पीडितेच्या आईलाही याप्रकरणात अटक करण्यात आली आहे.

ती महिला कोण?

पीडितेच्या आईला भेटलेली महिला कोण आहे, तिचा आणि डिआरचा संपर्क कसा आला. या सर्व गोष्टींचा सखोल तपास करण्याची गरज आहे. त्या महिलेने यापूवीर्ही अनेक मुलींना पैशाच्या आमिषातून फसविल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेऊन अटक करण्याची गरज आहे.

संथ गतीने सुरू आहे तपास

बालू उर्फ प्रवीण मंगरूळकर हा डिआर (मांत्रिक) याला कुवारां पेपर (पीडिता) यांचे फोटो, त्यांचे नाव, वजन, पत्ता, उंची आदी वैयक्तीक माहिती एका कागदावर लिहून त्याचा फोटो डिआरच्या मोबाईलवर पाठवित असल्याची माहिती आहे. इतकेच नव्हेतर त्याने पीडितेचाही विवस्त्र व्हिडिओ मोबाईलमध्ये काढल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलची सखोल तपासणी केल्यास अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता असून, अनेक महिला, मुली यातून मुक्त होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com