esakal | शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा; शाळा बंद आढळल्यास होणार कारवाई

बोलून बातमी शोधा

Warning from education officials Action will be taken if the school is found closed

कोरोनामुळे इयत्ता पहिली ते आठवीचे पुरेसे अध्यापन झाले नसल्याने या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार वर्गोन्नत केले जाणार आहे. अगोदर ५० टक्‍के उपस्थिती त्यात वेळेचे बंधन पाळले जात नाही.

शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा; शाळा बंद आढळल्यास होणार कारवाई
sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थी शाळेत येत नसल्याने काही शाळांतील शिक्षकांनीही शाळेकडे पाठ फिरवल्याचे भीषण वास्तव शिक्षण सभापती व इतरांसमोर येत आहे. यापुढे शालेय वेळेत शाळेला कुलूप दिसल्यास शिक्षकांसह पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांवरसुद्धा कार्यवाही करणार असल्याचा इशारा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी दिला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावात राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. शिक्षक संघटनांनी सुरुवातीला हो-नाही करीत कसेतरी हे सर्वेक्षण शेवटास नेले. यादरम्यान अमरावती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सुरेश निमकर यांनी जिल्ह्यातील काही शाळांना भेटी द्यायला सुरुवात केली. या भेटीदरम्यान त्यांना काही शाळा कुलूपबंद आढळल्या.

जाणून घ्या - आता याला काय म्हणावे! मृत शिक्षिकेमागेही कोरोना सर्वेक्षणाचे काम, एसडीओ कार्यालयाचा अजब कारभार

वर्षभरापासून विद्यार्थ्यांविना शाळा ओस पडल्याने शिक्षक अद्यापही शाळेत रुळले नाहीत. राज्य शासनाने सुरुवातीला ५० टक्‍के, नंतर शंभर टक्‍के व आता पुन्हा ५० टक्‍के उपस्थितीचे आदेश दिले. मात्र, काही शिक्षकांना अपडाउन गैरसोयीचे व परवडत नसल्याने शाळा कदाचित बंद राहत असाव्यात, असे काहींचे म्हणणे आहे.

कोरोनामुळे इयत्ता पहिली ते आठवीचे पुरेसे अध्यापन झाले नसल्याने या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार वर्गोन्नत केले जाणार आहे. अगोदर ५० टक्‍के उपस्थिती त्यात वेळेचे बंधन पाळले जात नाही. अशा परिस्थितीतही चक्क शाळा बंद राहत असल्याने समाजात शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन होत आहे.

अधिक वाचा - लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग, फेब्रुवारीतच झाले होते लसीकरण

कारवाईचा संदेश व्हायरल

शिक्षण सभापती व इतर पदाधिकाऱ्यांच्या शाळा भेटीदरम्यान शाळा बंद आढळून आल्याने त्याचे ताशेरे पर्यवेक्षीय यंत्रणेवर ओढले जात आहे. यापुढे शाळा सकाळी साडेसात ते साडेअकरा तसेच बांधकाम सुरू असलेल्या शाळेत पूर्णवेळ मुख्याध्यापक किंवा शिक्षक आढळून न आल्यास शिक्षक, मुख्याध्यापकांसह पर्यवेक्षकीय यंत्रणेला जबाबदार धरून कार्यवाही करणार असल्याचा शिक्षणाधिकाऱ्यांचा संदेश सर्वत्र व्हायरल होत आहे.