esakal | हृदयद्रावक : दहा वर्षीय मुलासह मातेची विहिरीत उडी अन्....वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

well in washim district.jpg

गेल्या आठवर्षांपासून त्या लोणी खुर्द येथे वडिल दिगंबर रघुवीर गिरी यांच्याकडे मुलासह राहत होत्या.

हृदयद्रावक : दहा वर्षीय मुलासह मातेची विहिरीत उडी अन्....वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रिसोड (जि.वाशीम) : दहा वर्षीय मुलासह मातेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील लोणी खुर्द शेतशिवारात आज (ता.29) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मृतक महिलेचे नाव सुनीता विवेक गिरी असून, मुलाचे नाव कृष्णा विवेक गिरी (वय अंदाजे 10 वर्षे) असे आहे. मृतक महिला ही अकोला येथील रहिवासी असून, गेल्या आठ वर्षांपासून त्या वडिलांकडे राहत होत्या.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रिसोड तालुक्यातील लोणी खुर्द येथील विठ्ठल कोकाटे यांचे गट क्रमांक 185 मध्ये शेत आहे. या शेतातील विहिरीत बुधवारी (ता.29) सकाळी सात वाजताच्या सुमारास दोन मृतदेह आढळून आले. हे मृतदेह सुनीता विवेक गिरी व कृष्णा विवेक गिरी या मायलेकाचे असल्याचे उघडकीस आले. ही घटना मंगळवारी (ता.28) रात्रीच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज आहे.

महत्त्वाची बातमी - हृदयद्रावक : पोहण्यासाठी त्याने मारली विहिरीत उडी अन्...

घटनेची माहिती लोणी खुर्द येथील तलाठी जाधव यांनी रिसोड तहसीलदार यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन सुनीता गिरी व मुलगा कृष्णा विवेक गिरी यांचे मृतदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रिसोड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची नोंद रिसोड पोलिसांत झाली असून, पुढील तपास पोलिस अधिकारी कातडे करीत आहेत.

हेही वाचा - अनुशेष कायम ठेवून वैधानिक विकास मंडळावर फुली...!

मृतक महिला अकोला येथील
मृतक महिला सुनिता विवेक गिरी ह्या अकोला येथील आहेत. मात्र, गेल्या आठवर्षांपासून त्या लोणी खुर्द येथे वडिल दिगंबर रघुवीर गिरी यांच्याकडे मुलासह राहत होत्या. मात्र, अचानक माय-लेकाने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
सदरील महिलेने आपल्या दहा वर्षीय मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे या आत्महत्येमागचे नेमके कारण काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच आत्महत्येचे कारण तपासात पुढे येईल.