esakal | हृदयद्रावक : पोहण्यासाठी त्याने मारली विहिरीत उडी अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

dhyaneshwar pise.jpeg

युवक मित्रासोबत गावाजवळील सरपंच विकास दत्तायत्र पिसे यांच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेला असता विहीरी पोहत असताना बराच वेळ ज्ञानेश्वर विहीरीत दिसून आला नसल्याने मित्राने ज्ञानेश्वरच्या भावास सांगितले.

हृदयद्रावक : पोहण्यासाठी त्याने मारली विहिरीत उडी अन्...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सुलतानपूर (जि.बुलडाणा) : लोणार तालुक्यातील शिवणी पिसा येथील पोहण्यास गेलेल्या युवकाला विहिरीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडल्याने मृत्यू झाल्याची घटना (ता.28)  संध्याकाळी 7 वाजेदरम्यान उघडकीस आली.

शिवणी पिसा येथील ज्ञानेश्वर रामकिसन पिसे (वय 21) हा युवक मित्रासोबत गावाजवळील सरपंच विकास दत्तायत्र पिसे यांच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेला असता विहीरी पोहत असताना बराच वेळ ज्ञानेश्वर विहीरीत दिसून आला नसल्याने मित्राने ज्ञानेश्वरच्या भावास सांगितले. ही घटना गावात माहीत होताच अनेकांनी विहिरीकडे धाव घेतली. परंतु, विहीरीत भरपूर पाणी असल्याने मृतक ज्ञानेश्वर पिसे विहीरीत दिसत नव्हता. अनेकांनी विहिरीत उडया घेवून पाण्यात शोध घेण्याचाही प्रयत्न केला परंतु, उपयोग झाला नाही. 

महत्त्वाची बातमी - धक्कादायक : ‘त्या’ कोरोना बाधितांच्या संपर्कात आले 39 पोलिस

शेवटी विहिरीवर जि.प. सदस्य पती दिलीपराव वाघ, सरपंच विकास पिसे, भिकाजी पिसे, पुरोषोत्तम पिसे, सिध्देश्वर पिसे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने दोन मोटारपंप लावून विहीरीतील पाण्याचा उपासा केल्यानंतर मृतक युवक ज्ञानेश्वर रामकिसन पिसे याचा मृतदेह संध्याकाळी 7 वाजेदरम्यान विहिरीतील एका कोपऱ्यात आढळून आला. सदर घटनेची माहिती पोलिस पाटील नरेंद्र पिसे यांनी मेहकर पोलिस स्टेशनला दिल्यावरुन बीट जमादार प्रभाकर सानप, पोकॉ निवृत्ती सानप हे घटनास्थळी पोहचून पुढील तपास करीत होते.