अखेर जन्मदात्री आईच निघाली 27 दिवसांच्या मुलीची खूनी!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

जन्मदात्या मातेनेच चक्क आपल्या पोटच्या 27 दिवसांच्या जुळ्या मुलींपैकी एकीला पाण्याच्या टाक्‍यात बुडवून ठार मारल्याची घटना 23 जून रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी पाच दिवसांनंतर संपूर्ण तपासाअंती पवनी पोलिसांनी आज त्या निर्दयी आईवर गुन्हा दाखल करून अटक केली. माता न तू वैरीणी ठरलेल्या महिलेचे नाव अफलिया रामटेके असे नाव आहे.

पवनी(जि.भंडारा) : मातेच्या प्रेमाच्या कितीतरी कथा, कितीतरी दाखले आपण पुराणकालापासून ऐकतो. आईच्या प्रेमाचे गुण गाणाऱ्या किती कविता लिहिल्या गेल्या आहेत. आपला जीव धोक्‍यात घालून प्राणी सुद्धा पिलाचा जीव वाचवते, अशा कितीतरी घटना आपण ऐकत असतो. भंडारा जिल्ह्यात मात्र एका निष्ठुर आईने आपल्या 27 दिवसांच्या निष्पाप मुलीचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली. आणि समाजमन हादरून गेले. अजून पुरते डोळेही न उघडलेल्या या मुलीचा दोष तरी काय, की जिला तिच्या आईनेच संपवावे, असा प्रश्‍न नागरिकांमध्ये उपस्थित होतो आहे.

जन्मदात्या मातेनेच चक्क आपल्या पोटच्या 27 दिवसांच्या जुळ्या मुलींपैकी एकीला पाण्याच्या टाक्‍यात बुडवून ठार मारल्याची घटना 23 जून रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी पाच दिवसांनंतर संपूर्ण तपासाअंती पवनी पोलिसांनी आज त्या निर्दयी आईवर गुन्हा दाखल करून अटक केली. माता न तू वैरीणी ठरलेल्या महिलेचे नाव अफलिया रामटेके असे नाव आहे.

पवनी येथील गौतम वॉर्डात निश्‍चय रामटेके वास्तव्यास आहेत. त्याची पत्नी अफलिया हिने जुळ्या मुलींना जन्म दिला होता. त्यापैकी एका मुलीला तिने कुटुंबीयांचे लक्ष चुकवून स्नानगृहातील टाक्‍यात बुडविल्याची घटना समोर आली होती. निश्‍चय रामटेके व अलफिया यांनी 1 वर्षापूर्वी आंतरधर्मीय प्रेमविवाह केला होता. मे महिन्यात अलफिया हिने जुळ्या मुलींना जन्म दिला. परंतु, ती खूष नव्हती. एक दिवस संधी साधून तिने आपल्या एका मुलीला घरातील स्नानगृहतील पाण्याच्या टाक्‍यात बुडवून ठार केल्याची कबुली पोलिसांना दिलेल्या बयाणात दिली आहे. आज पवनी पोलिसांनी अलफियाला अटक करून सायंकाळी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिची कारागृहात रवानगी केली आहे.

 सविस्तर वाचा - गुन्हे शाखेमुळे गॅंगवार टळला, हे आहे कारण...

वहिनीवरील संशय खरा ठरला
चिमुकलीचा मृतदेह टाक्‍यात आढळून आला. ही घटना घडताच निश्‍चयचा भाऊ अक्षय रामटेके याने पोलिस तक्रारीत वहिनी अलफिया हिच्यावर संशय व्यक्त केला होता. परंतु, जन्मदात्री आईच पोटच्या मुलींशी असे काही करेल यावर इतर कुटुंबीयांचासुद्धा विश्‍वास नव्हता. यासंदर्भात गेल्या 5 दिवसांत पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पवनी, पालांदूर येथील पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक यांनी विशेष पथक तयार करून चौकशी व तपासाची सूत्रे वेगाने फिरविली. अखेर आईनेच मुलीला ठार केल्याचे कबूल केले. अलफिया रामटेके (वय 23) हिला अटक करून न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने पोलिस कोठडी न देता तिची कारागृहात रवानगी केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother killed her 27 days baby

Tags
टॉपिकस
Topic Tags: