esakal | प्रेताच्या राखेतून भाकर शोधते माय, माणसाच्या अंतातून सुरू होते कोणाच्या तरी जगण्याची धडपड
sakal

बोलून बातमी शोधा

The mother seeks bread from the ashes of the corpse read full story

प्रेत जळल्यानंतर अस्थी विसर्जनाच्या प्रतीक्षेत या महिला असतात. एकदाचे अस्थिविसर्जन झाले की, पाण्यातील ती राख जमा करून राखेतूनही जळलेली सोन्याची भुकटी किंवा पूर्ण मणी तसेच अस्थीत टाकलेली नाणी शोधून पोटाची खळगी भरणारा हा समाज मुख्य प्रवाहात आला नाही. उमरेड, भिवापूर येथे बहुसंख्येने हा समाज दिसतो.

प्रेताच्या राखेतून भाकर शोधते माय, माणसाच्या अंतातून सुरू होते कोणाच्या तरी जगण्याची धडपड

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : किनाऱ्यावर उभे राहून चौफेर नजर फिरवल्यास वैनगंगेचे विशाल पात्र नजरेत भरते. येथील किनाऱ्यावर दशक्रिया घाट आहेत. अंत्यसंस्कारांनंतर अस्थी विसर्जित करण्याचा हा परिसर. या नदीकिनाऱ्यावर कुणाच्या तरी जीवनाचा अंत होत असताना कुणाच्या तरी जगण्याची मात्र धडपड सुरू होते. पोटाची खळगी भरण्यासाठी हातात टोपले घेऊन पोट भरण्याची धडपड घाटावर सुरू होते.

त्यांच्या जगण्याला येथे आधारही मिळतो. प्रेताच्या राखेतून लेकरांच्या पोटासाठी भाकर शोधण्यासाठी मातांच्या जिवाचा आटापिटा सुरू असतो. पवनीच्या वैजेश्वर घाटासह, दिवाण घाट, पवनखिंड या घाटांवर हे प्रसंग नित्याचेच. पिढ्यान पिढ्या सुरू असलेली सोनझरी समाजाची ही विदारक परिस्थिती स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही बदललेली नाही.

हेही वाचा - हृदयद्रावक! एकुलत्या एक मुलाचा भटक्या कुत्र्याने घेतला जीव; विधवा आईवर कोसळला दुखाचा डोंगर

पवनीतील वैजेश्वर घाटावर दररोज अनेक अंत्यविधी पार पडतात. शेकडो कुटुंबीय आपल्या जवळच्या नातेवाइकांच्या अंत्यसंस्कारासाठी तसेच अस्थिविसर्जनासाठी घाटावर येतात. विविध धर्माच्या परंपरेप्रमाणे प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. महिलेचे शवाच्या अंत्यविधीच्यावेळी सोन्याचा मणी जिभेवर ठेवण्याची प्रथा असते. तर पुरुष मृताच्या तोंडात सोन्याचा तुकडा ठेवतात. शिवाय प्रेताच्या कपाळावर नाणे लावण्याचीही प्रथाही आजही समाजात आहे.

प्रेत जळल्यानंतर अस्थी विसर्जनाच्या प्रतीक्षेत या महिला असतात. एकदाचे अस्थिविसर्जन झाले की, पाण्यातील ती राख जमा करून राखेतूनही जळलेली सोन्याची भुकटी किंवा पूर्ण मणी तसेच अस्थीत टाकलेली नाणी शोधून पोटाची खळगी भरणारा हा समाज मुख्य प्रवाहात आला नाही. उमरेड, भिवापूर येथे बहुसंख्येने हा समाज दिसतो.

अधिक माहितीसाठी - राणे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणाचे गूढ उकलले : कुत्र्याचे इंजेक्शन देऊन पत्नीने केला पती, मुलांचा खून

सोनझरी समाजातील स्त्रिया, मुले अख्खा दिवस पाण्यात राहून नेमकी राख कुठे टाकली, अस्थीने भरलेले पोते कुठे टाकले याचा शोध घेतात. मात्र, पवनीतील घाटांवर महिलाच दिसतात. ही राख विसर्जित केल्याबरोबर महिला पाण्याच्या दिशेने धाव घेतात. जड राखेला टोपल्यात जमा करतात, ती गाळतात. आणखी किती वर्षे स्मशानातील सोनं मिळवण्यासाठी पाण्यात हा समाज आयुष्य झिजवेल हे सद्यातरी सांगणं कठीण आहे. 

जगण्यासाठी कलात्मक कसरत

राख आणि वाळू बाजूला करण्याची कलात्मक कसरत सुरू होते. राखेतून मिळालेली नाणी, मणी ते तोंडात गालात जमा करतात. वारंवार पाण्यातून निघणे कष्टाचे होते म्हणून लढविलेली ही अभिनव अशी शक्कल. पूर्वी सोन्याचा मणी हमखास मिळत असे, परंतु अलीकडे क्वचितच सोन्याचा मणी सापडतो. अस्थी राख विसर्जन करीत असताना ते जवळच पाण्यात उभे असले तरी पोत्यातील साहित्य देण्यास नातेवाईक तयार नसतात. ते पाण्यातच विसर्जित करतात. कित्येकदा ‘द्या मी विसर्जन करून देतो’ म्हटले तरी दुरून देऊ नका, पाण्यातच विसर्जित करा असे ओरडतात. कित्येकजण नदी पुलावरून जाताना शिक्के पाण्यात फेकतात. प्रेत जळत असताना चलनातील नाणी सरणात टाकतात. मौल्यवान वस्तूही अग्नीसंस्कारांदरम्यान टाकतात. त्यामुळे प्रेताच्या राखेतूनही काही मिळेल या आशेवर हा सोनझारी समाज आपले कौशल्य वापरून उपजीविकेचे साधन शोधतो.

अधिक वाचा - दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला की पेढे वाटणे अशी शिवसेनेची परिस्थिती; देवेंद्र फडणवीसांची टीका

इतरांना देण्यासाठी नातेवाईकांनी पुढाकार घ्यावा
स्मशानातील हे सोनं शोधणाऱ्या या सोनझाऱ्याची व्यथा, वेदना मागील सत्तर वर्षांत समजू शकली नाही. चालीरीती, परंपरा जोपासत असताना सामाजिक भान ठेवणे आजच्या आधुनिक समाजाला गरजेचे वाटायला हवे. ऐवज पाण्यात फेकून इतरांना पोटाची खळगी भरण्यासाठी शोधायला लावण्यापेक्षा जो ऐवज श्रद्धेपोटी प्रेताला अर्पण करायचा आहे. तो थेट इतरांना देण्यासाठी नातेवाईकांनी पुढाकार घ्यावा. यामुळे नातेवाईकांना मानसिक समाधान मिळू शकेल. 
- ॲड. जे. जनार्दन,
खापरी-पवनी

संपादन - नीलेश डाखोरे

loading image