Motivational Story : मेळघाटातील सामाजिक बदलासाठी प्रेमदया शंकर कसदेकर यांचा संघर्षमय प्रवास

Melghat Tribal Empowerment : मेळघाटातील पाणी, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक अंधश्रद्धांविरुद्धचा प्रेमदया कसदेकर यांचा संघर्ष म्हणजे एका खऱ्या परिवर्तनाची सुरूवात आहे.
The Story of Premdaya Kasdekar

The Story of Premdaya Kasdekar

esakal

Updated on

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्याच्या घनदाट जंगलात वसलेले मेळघाट हे तेथील समृद्ध वनस्पती आणि प्राण्यांसाठी ओळखले जाते आणि कोरकू आदिवासी समुदायाचे घर आहे. परंतु नैसर्गिक सौंदर्यामागे एक असा प्रदेश आहे, जो दशकांपासून पाण्याची टंचाई, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्यसेवेचा अभाव, संपर्क अभाव आणि खोलवर रुजलेल्या सामाजिक श्रद्धांशी झुंजत आहे. सदया फाउंडेशनचे संस्थापक प्रेमदया शंकर कसदेकर यांच्या मते, ही आव्हाने केवळ आकडेवारी नव्हती तर ते एक वास्तव होते.

तारुबांडा गावात लहानाचे मोठे झालेल्या कसदेकरांनी पाहिले की, मेळघाटातील जवळ-जवळ ९० टक्के गावांना उन्हाळ्यात तीव्र पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असे. त्यामुळे महिला आणि मुलांना पाण्यासाठी काही किलोमीटर चालावे लागत असे. शाळांमध्ये साधनसामुग्रीची कमतरता होती, आरोग्यसेवा दूर होती आणि आजारांवर वैद्यकीय उपचारांऐवजी गंडेदोरे केले जात असत. दुर्गम गावांमध्ये वाहतूक किंवा अगदी वर्तमानपत्रांचीही सोय नव्हती. त्यामुळे येथील लोक इतर समाजाच्या तुलनेत दोन दशके मागे होते. या संघर्षांनी प्रेम यांच्या आपल्या समाजात बदल घडवून आणण्याच्या दृढनिश्चयाला आकार दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com