esakal | मोटरसायकल चोरण्यात होता त्यांचा हातखंडा! आता आहेत गजाआड
sakal

बोलून बातमी शोधा

thieves.

मोटारसायकल चोरी करून परराज्यात त्यांची विक्री करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. ही कारवाई रविवारी (ता. 15) करण्यात आली. चंद्रेश ऊर्फ बल्लू रामनाथ डहारे (रा. येरवाघाट, ता. खैरलांजी, जि. बालाघाट म.प्र.) असे आरोपीचे नाव आहे.      

मोटरसायकल चोरण्यात होता त्यांचा हातखंडा! आता आहेत गजाआड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भंडारा : एकाची गाडी चोरून दुस-याला विकून पैसे कमविणा-या दोघा अट्टल चोरांना पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले. आतापर्यंत त्यांनी अनेकांना गंडा घातला आहे. मोटारसायकल चोरी करून परराज्यात त्यांची विक्री करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. ही कारवाई रविवारी (ता. 15) करण्यात आली. चंद्रेश ऊर्फ बल्लू रामनाथ डहारे (रा. येरवाघाट, ता. खैरलांजी, जि. बालाघाट म.प्र.) असे आरोपीचे नाव आहे.                                                    तो खासगी वाहनचालक असून सध्या अदानी पॉवर प्लॅन्ट येथे वास्तव्यास आहे. दुसरा आरोपी राजू मोतीलाल लिल्हारे (रा. दांडेगाव, जि. गोंदिया) हासुद्धा वाहनचालक आहे. दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. दर दोन-चार दिवसात वेगवेगळ्या कंपनीच्या जुन्या मोटारसायकल नंबरप्लेट बदलून ते आजूबाजूच्या गावांमध्ये कमी किमतीत विकायचे. त्यांच्याकडे लाल रंगांची एमएच 36 व्ही 4390 क्रमांकाची एक पल्सर कंपनीची मोटारसायकल असून ते दांडेगावच्या दिशेने गेले, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.                                                           

पोलिसांनी घेतले ताब्यात                                                                पोलिसांनी दांडेगाव येथून दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या कंपनीच्या चार मोटारसायकली विविध ठिकाणांवरून चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडे तेव्हा असलेली पल्सर मोटारसायकल हीसुद्धा चोरीचीच असून ती तुमसर येथून पळविल्याचे पंचासमक्ष सांगितले. त्याबाबत तुमसर ठाण्यात चोरीला गेल्याची नोंद आहे.   

सविस्तर वाचा - विदर्भवाद्यांनी केले आंदोलन स्थगित...हे आहे कारण                                                                                

तुमसरातूनही चोरली दुचाकी                                                                       राजू लिल्हारे याच्या घरासमोर असलेली पोपटी रंगाची हिरोहोंडा स्प्लेंडर प्रो (एमएच 36 क्‍यू 3051) ही दुचाकीसुद्धा गुरुनानक वॉर्ड तुमसर येथून चार ते पाच महिन्यांपूर्वी दोघांनी चोरल्याचे कबूल केले. 1 महिन्यापूर्वी शीतला मातामंदिरासमोरून एम.एच. 34 एक्‍स 1776 ही सुपर स्प्लेंडर अशा एकूण चार मोटारसायकल त्यांनी चोरी केल्याचे सांगितले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गजानन कंकाळे व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.

loading image