esakal | विदर्भवाद्यांनी केले आंदोलन स्थगित... हे आहे कारण
sakal

बोलून बातमी शोधा

Agitation

विदर्भवाद्यांकडून 1 मे हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदासुद्धा ही मालिका कायमच राहणार आहे. समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विदर्भवादी काळी फित बांधून घरीच महाराष्ट्र दिनाच्या विरोधासह वेगळ्या विदर्भाची मागणी करतील.

विदर्भवाद्यांनी केले आंदोलन स्थगित... हे आहे कारण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : विदर्भवाद्यांनी यंदाही महाराष्ट्र दिनी "विदर्भ बंद' आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार विदर्भात तयारीसुद्धा करण्यात आली. परंतु, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे आंदोलन स्थगीत करण्याचा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीने घेतला आहे. निषेध मात्र कायम राहणार असून शुक्रवारी (ता.1) विदर्भवादी घरीच काळी पट्टी बांधून बसून महाराष्ट्र दिनाचा निषेध नोंदवतील. 

विदर्भवाद्यांकडून 1 मे हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदासुद्धा ही मालिका कायमच राहणार आहे. समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विदर्भवादी काळी फित बांधून घरीच महाराष्ट्र दिनाच्या विरोधासह वेगळ्या विदर्भाची मागणी करतील. घोषणांचा व्हिडिओ, फोटो सोशल मिडियावरून शेअर केले जातील. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला यंदा 60 वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे यंदाचे आंदोलन अधिक व्यापक करण्याचा विदर्भ राज्य आंदोलन समितीचा प्रयत्न होता. त्यासाठी विदर्भात सर्वदूर तयारीही करण्यात येत होती. कोरोनामुळे आंदोलन ऐनवेळी स्थगित करावे लागले. 

60 वर्षात पश्‍चिम महाराष्टाने विदर्भाचे चहुबाजूने शोषण केले. परिणामी विदर्भ आज गरीब, दरिद्री, बेरोजगार, कोराडा झाला असून 40 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेरोजगारांची फौज विदर्भात उभी झाली असून विकासाचा प्रचंड अनुशेष तयार झाला आहे. 

अल्पवयीन मुलीचे चार वर्षे केले शोषण अन् ती झाली गर्भवती...

जनतेने घरूनच पाठिंबा द्यावा
विदर्भातील जनतेने घरूनच आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे. सोबतच कोरोनाचे संकट निवळल्यावर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

go to top