

Washim
esakal
मंगरूळपीर: यंदाच्या अनियमित व खंडित पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यावर दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले असून, जलसाठ्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १९६ मिमी पावसाची नोंद झाली असून, लघू-मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी अवघा १०.३५ टक्के साठा शिल्लक आहे. यात मंगरूळपीर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोतसावंगा प्रकल्पाची अवस्था सर्वाधिक गंभीर असून, प्रकल्पातील जलसाठा केवळ ८ टक्क्यांवर घसरला आहे. हा प्रकल्प कोरडा झाला तर शहराची तहान कशी भागेल असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.