Amravati News: मोझरीच्या डॉक्टरचा विहिरीत बुडून मृत्यू
Mozari Ayurvedic Professor: मोझरीतील आयुर्वेदिक प्राध्यापक डॉ. एकनाथ मोहोड यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना. चांदूरबाजार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. गावातील सेवाभावी डॉक्टर गमावल्याने ग्रामस्थांत हळहळ व्यक्त.
बेलोरा : चांदूरबाजार तालुक्यातील माधान येथील प्रा. डॉ. एकनाथ माणिकराव मोहोड (वय ७७) हे विहिरीत पडून बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. ते मोझरी येथील आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.