VIDEO : 'राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी'

प्रशिक मकेश्वर
Thursday, 7 January 2021

सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत जो घोटाळा झाला त्याबाबत चौकशी व्हावी, अशी राणा दाम्पत्याची मागणी होती. यासंदर्भात आज माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी राणी दाम्पत्या नाटक कंपनी आहे, असे ते म्हणाले.

तिवसा (जि. अमरावती ) : बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि शिवसेना नेते व अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यातील वाद पुन्हा शिगेला पोहोचला आहे.  रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी अडसूळविरोधात ईडी कार्यालयात कागदपत्रे सादर करून चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर आता आनंदराव अडसूळ यांनी उत्तर दिले आहे.

हेही वाचा - बसण्यापूर्वीच करा वयाचा विचार, अन्यथा खावी लागणार तुरुंगाची हवा; जाणून घ्या 'हे...

सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत जो घोटाळा झाला त्याबाबत चौकशी व्हावी, अशी राणा दाम्पत्याची मागणी होती. यासंदर्भात आज माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी राणी दाम्पत्या नाटक कंपनी आहे, असे ते म्हणाले. ज्यावेळी त्यांच्या अंगाशी काही गोष्टी येतात तेव्हा दुसऱ्याला कस बदनाम करता येईल हाच प्रयत्न ते करतात. त्यांच्या जातप्रणाणपत्राचे प्रकरण आपल्याविरोधात जाणार याची कल्पना त्यांना आहे. तसेच निवडणुकीमध्ये जास्त प्रमाणात केलेला खर्च हा नियमबाह्य आहे. त्यामुळे आमदारकी सुद्धा धोक्यात आहे. त्यामुळे खासदारकी व आमदारकी जाणार या भीतीने ते चलबिचल झाले आहेत, असा आरोप अडसूळ यांनी केला आहे.  

सिटी को-ऑप बँकेत घोटाळा झाला. त्याबाबत मी स्वतः तक्रार केली असून त्याच्या सर्व चौकशीसाठी मी समोर जाण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे.

हेही वाचा - बापरे! ग्रामपंचायत निवडणुकीत ९५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कोरोना

ईडी ही केंद्रीय एजन्सी असून त्या माध्यमातून शिवसेना नेते व पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीने होत आहे. संजय राऊत यांच्या पत्नीची चौकशी ही एक बदनाम करण्याचे कटकारस्थान आहे. राज्यातील सत्ता गेल्याने विकास आघाडीतील नेते कसे अडचणीत आणता येईल हाच प्रकार सध्या भाजपकडून होत आहे, असेही यावेळी शिवसेना नेते व माजी खासदार आंनदराव अडसूळ म्हटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp anadrao adsul criticized mp navneet and MLA ravi rana in amravati