
पाच जानेवारीपर्यंत एकूण ९५ कर्मचारी, अधिकारी तसेच उमेदवार पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सर्वाधिक ४१ पॉझिटिव्ह धारणी तालुक्यातील आहेत.
अमरावती : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत पाच जानेवारीपर्यंत एकूण ९५ कर्मचारी, अधिकारी तसेच उमेदवार पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सर्वाधिक ४१ पॉझिटिव्ह धारणी तालुक्यातील आहेत.
हेही वाचा - खवय्यांनो, बिनधास्त खा चिकन; पशुवैद्यक तज्ज्ञांचा हा...
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. पाच जानेवारीपर्यंत अमरावती तालुक्यात १८, भातकुली ४, नांदगावखंडेश्वर २, दर्यापूर ६, अंजनगावसुर्जी १, तिवसा ४, चांदूररेल्वे ६, चांदूरबाजार १, मोर्शी ३, वरुड ७, धारणी ४१, तर चिखलदरा तालुक्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. १७ निवडणूक अधिकारी, ९ उमेदवार, २ तलाठी, २ शिक्षक, ७ कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
हेही वाचा - बसण्यापूर्वीच करा वयाचा विचार, अन्यथा खावी लागणार तुरुंगाची हवा; जाणून घ्या 'हे...
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, यासाठी शासनस्तरावर अनेकदा आवाहन करण्यात आले आहे. निवडणुकीतील वादविवाद, तंटे टाळण्यासाठी अनेकांनी याकामी पुढाकार घेतला खरा. मात्र, 553 पैकी केवळ 14 ग्रामपंचायतींनी निवडणुकीला खो दिला आहे. 1215 उमेदवारांनी मैदान सोडल्यानंतर आता 11 हजार 353 उमेदवार रिंगणात आहेत. चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर ठाकले आहे. 15 जानेवारीला मतदान असून 18 ला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.