Anil Bonde: खासदार बोंडेंच्या आक्षेपानंतर मजुरांची चौकशी; मजूर बांग्लादेशी असल्याचा आरोप
Amaravati Highway: खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी राष्ट्रीय महामार्गावर ऑटो थांबवून मजुरांची चौकशी केली. पोलिस तपासणीत सर्व मजूर पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याचे समोर आले.
अमरावती : खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी राष्ट्रीय महामार्गावर परप्रांतीय मजुरांचा ऑटो थांबवून त्यांची पोलिसांकडून तपासणी व्हावी, अशी मागणी केली. त्यामुळे पोलिसांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. शनिवारी (ता.१६) सकाळी हा प्रकार पुढे आला.