esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

MP balu dhanorkar orders to form committee to watch on private hospitals in chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांसाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयात जवळपास दोन हजार सातशे 700 खाटा उपलब्ध आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे एक हजार खाटांची व्यवस्था त्वरित करावी, अशा सूचना खासदार धानोरकरांनी दिल्या.

'पॅकेज' नाही, शासकीय नियमाने शुल्क घ्या; खासदार बाळू धानोरकरांचे निर्देश

sakal_logo
By
श्रीकांत पशेट्टीवार

चंद्रपूर : कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शासकीय यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील 16 खासगी रुग्णालयांना कोविड केंद्राची मान्यता दिली आहे. मात्र, येथे 'पॅकेज' वसूल केले जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांकडून होत आहे. या रुग्णालयावर अंकुश ठेवण्यासाठी पथक स्थापन करण्याचे निर्देश खासदार बाळू धानोरकर यांनी दिले.

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार धानोरकरांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आढावा बैठक घेतली. येथील अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, मनपा आयुक्त राजेश मोहीते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी ङॉ. गेहलोत, चंद्रपूर शहर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रेय, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा, अशोक मत्ते, प्रमोद मगरे यांची उपस्थिती होती.

कोरोना संसर्गापेक्षा तपासणीचाच धसका, पत्ता खोटा, मोबाईल नंबरचाही घोळ

जिल्ह्यात कोरोना बाधितांसाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयात जवळपास दोन हजार सातशे 700 खाटा उपलब्ध आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे एक हजार खाटांची व्यवस्था त्वरित करावी. शहरातील खासगी रुग्णालयातील कोविड केंद्रातील उपलब्ध खाटा, राज्य शासनाने ठरवून दिलेले दर याचे फलक लावण्याच्या सूचना खासदारांनी यावेळी दिल्या.

केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार, जनता कर्फ्यू लागलेला नाही. नागरिक प्रशासनाला सहकार्य करीत आहे. परंतु, पोलिसांनी कुणावरही जबरदस्ती करू नये. कर्फ्यूमध्ये चाचण्यांची संख्या कमी होता कामा नये. अन्यथा कोरोनाग्रस्तांचा खरा आकडा समोर येणार नाही, अशी शंका खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केली. चंद्रपूर शहरात तीन खासगी रुग्णालयात सीटी स्कॅनची व्यवस्था आहे. नागपूर आणि शेजारच्या जिल्ह्यातील सिटीस्कॅन मशीनच्या तुलनेत चंद्रपूर येथील या मशीन अद्यावत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे यांची चौकशी करण्याचे आदेश खासदार बाळू धानोरकर यांनी दिले.

अहेरीत नागरिकांची आरोग्य तपासणी, 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेत आढळले 97 आयएलआय व...

कोविड रुग्णालयाला भेट -
चंद्रपूर शासकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयाला खासदार बाळू धानोरकर यांनी भेट दिली. त्यामध्ये अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा शल्य अधिकारी डॉ. निवृत्ती राठोड यांना रुग्णांची गैरसोय होऊ नये, अशा सूचना दिल्या. सोबतच महिला रुग्णालयातील चारशे पन्नास खाटांच्या कोविड रुग्णालयाची पाहणी केली.

loading image
go to top