esakal | खासदारांनी घेतला पुढाकार; शिवसैनिकांनी दहा हजार कुटुंबांच्या चेहऱ्यावर खुलविला आनंद
sakal

बोलून बातमी शोधा

mp bhavana gawali help.jpg

जिल्ह्यात 24 मार्चपासून येत्या 3 मे पर्यत सातत्याने लॉकडाऊन सुरु असल्याने हातावर कमावून पोट भरणाऱ्या अनेक मजुरदार, श्रमिक कुटुंबांची मोठी उपासमार होत आहे.

खासदारांनी घेतला पुढाकार; शिवसैनिकांनी दहा हजार कुटुंबांच्या चेहऱ्यावर खुलविला आनंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशीम : कोरोना महामारीमुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पाश्‍वभूमिवर शिवसेना खासदार भावनाताई गवळी यांच्या पुढाकारातून व शिवसैनिकांच्या सहकार्यातून जिल्ह्यातील तब्बल 10 हजार गोरगरीब कुटुंबांना धान्य व किराणा किटचे वितरण करण्यात आले. हा सामाजिक उपक्रम शनिवारी (ता.25) मानोरा, कारंजा, मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड या तालुक्यात शिवसैनिकांच्या परिश्रमातून घरोघरी सामाजिक अंतर ठेवून राबविण्यात आला. खासदार गवळी यांच्या मदतीमुळे लॉकडाउन काळात गोरगरिबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात 24 मार्चपासून येत्या 3 मे पर्यत सातत्याने लॉकडाऊन सुरु असल्याने हातावर कमावून पोट भरणाऱ्या अनेक मजुरदार, श्रमिक कुटुंबांची मोठी उपासमार होत आहे. कामधंदे ठप्प पडल्यामुळे पैशाची आवक नाही त्यामुळे जगावे कसे हाच प्रश्‍न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. ही बाब लक्षात घेवून शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पुढाकारातून व शिवसेना पदाधिकारी, जि.प. न.प. सदस्य आदींच्या सहकार्यातून गोरगरीब, निराधार, श्रमिक व कामगार कुटुंबांना मदत पोहचविण्यात आली. खा. गवळी यांच्यावतीने यापूर्वी जिल्हयातील दोन हजार कुटुंबांना किराणा किटचे वितरण करण्यात आले होते.

आवश्‍यक वाचा - अन् पोलिस सापडला जुगार खेळताना!

स्थानिक जनशिक्षण संस्थान येथील खासदार जनसंपर्क कार्यालयात शनिवारी (ता.25) खासदार भावना गवळी यांनी धान्य व किराणा किटचे वाटप करण्यात येणाऱ्या वाहनांची पाहणी करून वाहनांना रवाना केले. त्यानंतर जिल्ह्यातील मानोरा, कारंजा, मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड आदी लॉकडाऊन प्रभावित भागातील गोरगरीब, गरजू, निराधार, कामगार कुटुंबांना शिवसैनिकांच्या हस्ते घरोघरी जाऊन व सामाजिक अंतराचे भान ठेवून मदतीचे वाटप करण्यात आले. मिळालेल्या या मदतीमुळे गोरगरिबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

हेही वाचा - आनंदवार्ता : बुलडाणा जिल्ह्याचे कोरोनामुक्तीकडे ‘चवथे पाऊल..’!

या धान्य व किराणा मदत वितरणासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब देशमुख, उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, वाशीम तालुका प्रमुख रामदास मते पाटील, शशिकांत पेंढारकर, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, उपशहर प्रमुख नामदेवराव हजारे, गणेश पवार, मोहन देशमुख, माजी शहरप्रमुख नागोराव ठेंगडे, जि.प. सभापती विजय खानझोड सुरेश कऱ्हे, बालाजी वानखेडे, खंदारे महाराज, अशोक शिराळ, बाळू जैरव, गजानन ठेंगडे, गणेश गाभणे, केशव डुबे, चंदु खेलुरकर, बंडू शिंदे, बबलू अहीर, सतिश खंदारे, गजानन भुरभुरे, सागर धवसे, बालू माल, पांडूरंग पांढरे,बंडू शिंदे यांच्यासह जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी अथक परिश्रम घेतले.