"काँग्रेस तत्त्वे गुंडाळून बसली सत्तेत आणि पालकमंत्री शिकवतात शहाणपणा"; खासदार नवनीत राणांची पत्रकातून खोचक टीका 

अरुण जोशी
Wednesday, 30 September 2020

ज्या भाजपाच्या भरवश्यावर शिवसेना निवडून आली, त्याच शिवसेनेसोबत काँग्रेस आपली तत्वे गुंडाळून सत्तेत बसली हा जिधर दम उधर हम चा प्रकार नाही का, असा प्रश्‍न खासदार नवनीत राणा यांनी आज एक पत्रकाच्या माध्यमातून केला.

अमरावती ः स्वतःचे अपयश झाकण्यासाठी व लोकसभेत मी मांडलेल्या जनतेच्या हिताच्या प्रश्‍नांमुळे अस्वस्थ मानसिकतेच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आरोप केला की ‘जिधर दम उधर हम’. पण माझा पालकमंत्र्यांना प्रश्न आहे की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रवीण पोटे यांचे विरोधातील काँग्रेस उमेदवाराला केवळ १७ मते मिळाली. तेव्हा ‘जिधर दम उधर हम’ हाच फॉर्म्युला वापरणाऱ्या पालकमंत्र्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. 

ज्या भाजपाच्या भरवश्यावर शिवसेना निवडून आली, त्याच शिवसेनेसोबत काँग्रेस आपली तत्वे गुंडाळून सत्तेत बसली हा जिधर दम उधर हम चा प्रकार नाही का, असा प्रश्‍न खासदार नवनीत राणा यांनी आज एक पत्रकाच्या माध्यमातून केला.

भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता

खासदार राणा म्हणाल्या, कोरोना काळात सातत्याने सहा महिने खासदार म्हणून मी पायाला चक्र लावून फिरली. तेव्हा गोरगरिबांना मदत करीत होती. पालकमंत्री झोपल्या होत्या का? ज्या भाजपाच्या भरवश्यावर शिवसेना निवडून आली, त्याच शिवसेनेसोबत काँग्रेस आपली तत्वे गुंडाळून सत्तेत बसली हा जिधर दम उधर हम चा प्रकार नाही का? पालकमंत्र्यांचे सरकार मधील वजन शून्य आहे. 

या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन आराखड्यात महाराष्ट्रात सगळ्यात कमी निधी अमरावती जिल्ह्याला मिळाला. यावर पालकमंत्री गप्प का आहेत? मला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन दिले, तेव्हापासून विरोध करणाऱ्या व पूर्ण निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना मदत करणाऱ्या व माझ्या विरोधात प्रचार करणाऱ्या संकुचित मनोवृत्तीच्या यशोमती ताईंनी मला शहाणपणा शिकवू नये.

मी जिल्ह्यातील लोकांचे प्रतिनिधित्व करते. तरीही खासदार म्हणून पालकमंत्री मला शासकीय बैठकीत बोलवत नाहीत. सपशेल डावलतात, कारण मी सत्य बोलते व जनतेच्या हिताचा आवाज उठविते म्हणून त्यांना माझी अडचण होते. जनता सुज्ञ आहे. मागील ५ वर्षात सत्तेत असणाऱ्या राज्य सरकारने या जिल्हयाला प्रचंड निधी दिला व भरीव विकासकामे झाली. त्याचे लोकार्पण व भूमिपूजन करून बातम्या लावणाऱ्या पालकमंत्री यशोमतीताई आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात आपण काय दिवे लावले, हे दाखवावे. जिधर दम उधर हमचा आरोप करून मला टार्गेट करण्यापेक्षा विदर्भात आपल्या जिल्ह्यात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आहेत.

ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही, बेड नाही, सुविधा नाही, मृत्यूसंख्या जास्त आहे, त्याकडे लक्ष द्यावे व कोरोनाचा संसर्ग कमी करावा. जनतेला आनंदाचा बंब फोडण्याची संधी द्यावी. असा माझा त्यांना सल्ला आहे. 

या १० कामांना जाणार असाल तर आधार कार्ड नेण्यास चुकूनही विसरू नका; अन्यथा सेवांचे दरवाजे होणार बंद

जनताच माझा दम आहे व विकासकामे करण्याचा बम मी खासदार म्हणून नक्की फोडणार आहे. आपण आपले काम करा माझ्या कामात अडथळे निर्माण करू नका जनतेला संभ्रमित करण्यापेक्षा विकासात्मक कामात लक्ष द्या, एवढेच माझे पालकमंत्र्यांना सांगणे असल्याचे नवनीत राणा यांनी पत्रकात नमूद केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP navnit rana said hard words about congress