esakal | खासदार पुत्रावर अत्याचाराचा आरोप; थेट पोलिस महानिरीक्षकांकडे केली तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

wife atyachar

खासदार पुत्रावर अत्याचाराचा आरोप; पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा : येथील खासदार रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस याच्याविरोधात लैंगिक छळ केल्याची तक्रार पत्नीने पोलिस महानिरीक्षकांकडे केली आहे. या तक्रारीमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली आहे. या तक्रारीवर पोलिस अधिकारी काय कारवाई करतात, याकडे अनेकांचे लक्ष आहे.

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पंकज तडस यांनी काही वर्षांपूर्वी वर्ध्यातील मुलीला लग्नाचे अमिष देऊन लैंगिक शोषण केले. यात तिला गर्भधारणा झाली. यानंतर तिने लग्नाची गळ घातल्याने तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर ते दोघे देवळीचे घर सोडून वर्धा येथे राहत होते. येथे तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला व तिला बेदम मारहाण करून घरातून हाकलल्याचा आरोप पीडितेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीवर वर्धा पोलिसांनी काहीच कारवाई करण्यात आली नाही, असे नमूद करून तिने थेट नागपुरात पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा: पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार

पोलिस महानिरीक्षकांकडे दिलेल्या या तक्रारीत खासदार रामदास तडस, त्यांची पत्नी शोभा तडस, मुलगी सुनीता तडस यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. तक्रारीत आणखी गंभीर आरोप करण्यात आल्याने यात पोलिस विभाग काय कारवाई करतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मुलाने घरच्या कोणालाही विश्वासात न घेता परस्पर लग्न केले. यावर आम्ही कुठलाही आक्षेप न घेता मुलीला स्वीकारण्याची तयारी दर्शविली. परंतु, दोघांनीही देवळी सोडून वर्धा येथे राहण्याचा निर्णय घेतला. तेथे त्या दोघांत काय झाले माहीत नाही. या मुलीने थेट पोलिसात तक्रार केली. परंतु, ती येण्यास तयार नसल्याने आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे. तिला आजही घरी घेण्यास आम्ही तयार आहोत.
- रामदास तडस, खासदार, वर्धा
loading image
go to top