राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर भडकले खासदार; वीस दिवसांचा अल्टीमेटम

राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर भडकले खासदार; वीस दिवसांचा अल्टीमेटम

गडचिरोली : गडचिरोली ते चामोर्शीपर्यंत निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गाच्या संथ व समस्या निर्माण करणाऱ्या कामावर खासदार अशोक नेते (MP Ashok Nete) प्रचंड संतप्त झाले. तळोधी ते चामोर्शीपर्यंतचा महामार्ग २० दिवसांत पूर्ण करण्याचा अल्टीमेटम (Ultimatum) त्यांनी दिला आहे. (MPs angry over national highway work)

सोमवारी खासदार अशोक नेते यांनी चामोर्शी परिसरातील या महामार्गाची पाहणी करून तीव्र नाराजी व्यक्त केली. गडचिरोली-चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी ते तळोधीपर्यंतच्या रस्त्याचे काम जवळपास ७५ टक्‍के पूर्ण झाले आहे. तळोधी ते चामोर्शी शहरापर्यंतचा रस्ता तीन महिन्यांपासून खोदून ठेवलेला आहे. मात्र, अजूनही काम सुरू झाले नाही. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास रस्त्यावर २ ते ३ फूट पाणी साचेल व रहदारीस अडचण निर्माण होईल. या अपूर्ण बांधकामामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर भडकले खासदार; वीस दिवसांचा अल्टीमेटम
मोठी बातमी : तीन मुलींचा वैनगंगा नदीमध्ये बुडून करूण अंत

खासदार अशोक नेते हे चामोर्शीच्या दौऱ्यावर असताना शहरातील नागरिकांनी चामोर्शी शहरांतून जाणाऱ्या मार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी न झाल्यास मोठी अडचण निर्माण होईल, ही बाब खासदारांच्या निर्दशनास आणून दिली. यावेळी खासदार अशोक नेते यांनी नागरिकांची अडचण लक्षात घेत राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता व कंत्राटदार यांना दूरध्वनी करून चामोर्शी शहरातील रस्त्याचे काम २० दिवसांत पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी नागरिकांना रस्ता सुरळीत करून देण्याचे निर्देश दिले.

पावसाळ्यात पाणी साचून चारचाकी वाहने व पायदळ जाणाऱ्या नागरिकांना अडचण होणार असल्याने हे काम जबाबदारीने पूर्ण करण्याचे निर्देशही खासदार अशोक नेते यांनी दिले. रस्ता बांधकामाच्या पाहणीदरम्यान प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, कृषी सभापती रमेश बरसागडे, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, जयराम चलाख उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर भडकले खासदार; वीस दिवसांचा अल्टीमेटम
वर्धेत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; कोरोनावर केली होती मात

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी गडचिरोली शहरात याच राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असताना खासदार अशोक नेते यांच्या संपर्क कार्यालयापासून थोड्या अंतरावर जेसीबीने पाइपलाइन तोडण्यात आली होती. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा काही काळ बंद पडला होता. त्यावेळीही खासदारांनी या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून कंपनीला खडसावले होते. पण, त्यानंतरही या कंपनीला काहीही फरक पडला नाही. रस्ता बांधकामातील चालढकल आणि उचापती सुरूच आहेत.

कारवाईशिवाय पर्याय नाही

गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सातत्याने वादाच्या भोवऱ्यात राहिले आहे. या बांधकामात अनेक चुका झाल्या. त्यामुळे नागरिकांना सतत त्रास सहन करावा लागतो. कधी खासदारांच्या कार्यालयापासून काही अंतरावर पाइपलाइन फोडण्यात आली, तर कधी नवेगाव रै. सारख्या गावातील पाइपलाइन फोडून ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित करण्यात आले. याशिवाय ठिकठिकाणी अर्धवट राहिलेल्या व अडचणीच्या झालेल्या या महामार्गावर अनेक अपघात घडले. काही गंभीर जखमी झाले, तर काही जणांना प्राणही गमवावे लागले. पण, अक्षम्य चुका करूनही या महामार्ग निर्मात्यांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे कंत्राटदार अधिकच निर्ढावले असून आता जबर कारवाईशिवाय पर्याय नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

(MPs angry over national highway work)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com