esakal | भंडारा जिल्ह्यात महावितरण ॲक्‍शन मोडमध्ये; थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

MSEB started to cut connection of meters in Bhandara district

कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अर्थचक्रावर परिणाम झाला. यामुळे अनेक नागरिक विजेचे बिल भरू शकले नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखता महावितरण प्रशासनानेदेखील कोरोना काळात ग्राहकांवर वीजबिल भरण्याची सक्ती केली नाही.

भंडारा जिल्ह्यात महावितरण ॲक्‍शन मोडमध्ये; थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया सुरू

sakal_logo
By
मोहित खेडीकर

लाखनी (जि. भंडारा) : विजेचे बिल थकीत असलेल्या ग्राहकांना महावितरणने शॉक देण्याची कारवाई सुरू केली आहे. साकोली उपविभागातील सुमारे 100 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. याबाबत व्हीसीमध्येच अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश विभागाच्या वरिष्ठांनी दिले आहे. या कारवाई विरोधात नागरिकांत असंतोष असून, भाजपच्या नेत्यांनी मनमानीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अर्थचक्रावर परिणाम झाला. यामुळे अनेक नागरिक विजेचे बिल भरू शकले नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखता महावितरण प्रशासनानेदेखील कोरोना काळात ग्राहकांवर वीजबिल भरण्याची सक्ती केली नाही. मात्र आता महावितरणवर खर्चाचा बोजा वाढत असल्यामुळे त्यांनी वसुली मोहीम सुरू केली आहे.

हेही वाचा -  'पीएचसी'ची चौकशी करायला गेले, पण घडलं भलतंच, जावून बघताच ग्रामस्थांना बसला धक्का

मंगळवारी साकोली उपविभागातील सुमारे 100 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये लाखनी शहरातील 10 व तालुक्‍यातील 60 ग्राहकांचा समावेश आहे. ज्या ग्राहकांनी एप्रिल 2020 पासून एकदाही वीजबिल भरलेले नाही. त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे वितरण कंपनी ऍक्‍शन मोडमध्ये दिसत असली तरी, सर्वसामान्य वीजग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

कारवाईमुळे भरली धडकी

महावितरणचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी अचानक घरोघरी धडक देणे सुरू केले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चांगलीच धडकी भरली. या कारवाईमुळे घाबरलेल्या नागरिकांसमोर आता खिशात पैसे नसताना बिल भरायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मिटिंगमध्ये मिळाले आदेश 

सोमवारी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत वीजबिल थकीत असणाऱ्या ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्याबाबत तोंडी आदेश देण्यात आल्याचे उपकार्यकारी अधिकारी राजन लिमजे यांनी सांगितले.

नक्की वाचा - १७ दिवसांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता आरोपी;...

मनमानीविरोधात आंदोलन करणार 

राज्यातील महाविकास आघाडी सरकार मनमानी कारभार करत आहे. अडचणीच्या काळात गोरगरीब जनतेचे वीजबिल माफ करण्याऐवजी त्यांचे विजेचे कनेक्‍शन कापण्यात येत आहेत. या मनमानीविरोधात भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे यांनी दिला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image