जैनांच्या काशीने पांघरली हिरवी चादर

मुक्तागिरीची पर्यटकांना भुरळ; सातपुड्याच्या कुशीतील शिल्पकलेचे सौंदर्य
Muktagiri Siddhakshetra of Jains is blessed with natural beauty
Muktagiri Siddhakshetra of Jains is blessed with natural beauty

करजगाव (जि. अमरावती) - जैन धर्मीयांचे सिद्धक्षेत्र मुक्तागिरी तथा दक्षिण भारताचे शिखरजी मेंढागिरी सध्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. सातपुडा पर्वताच्या कुशीत या नैसर्गिक सौंदर्याची मुक्तपणे उधळण मुक्तागिरीवर सुरू आहे.

चारही बाजूंनी उंचच उंच पर्वतांच्या रांगा, दाट सावली देणारी विशालकाय झाडे, हिरव्यागार वेली, त्यावर रंगीबेरंगी फुले, सागवान वृक्ष, जवळच नागासारखी वळण घेत वाहणारी नाग नदी, तिचे उंचावरून दुधासारखे फेसागत कोसळणारे पाणी, त्याचे अंगावर उडणारे तुषार अशा मनमोहक दृश्यांनी जैनांच्या काशीवर निसर्गाची उधळण सध्या बघायला मिळत आहे. पर्यटकांची पावले आता मुक्तागिरीकडे वळू लागली आहेत.

मेंढागिरी आताची मुक्तागिरी या ठिकाणी जैन धर्माची पुरातन काळातील ५२ मंदिरे आहेत. या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्वच मंदिरे वेगवेगळ्या शतकातील आहेत. काही पंधराव्या तर काही सोळाव्या शतकातील अतिप्राचीन मंदिरे असून ती ४०० फूट उंच पर्वतावर वसलेली आहेत. ४०० फुटांवरून कोसळणारा धबधबा या ठिकाणी पाहायला मिळतो. विशेष म्हणजे, दहाव्या क्रमांकाचे मंदिर हे अकृत्रिम चैतालय म्हणून ओळखले जाते. या सर्व मंदिरांची निर्मिती एलिचपूरच्या (आताचे अचलपूर) इल राजाने केली आहे. सुमारे एक हजार वर्षांपूर्वीची भगवान पार्श्र्वनाथाची…. मूर्ती या ठिकाणी असून शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आजही अष्टमी व पौर्णिमेला केशर चंदनाचा या ठिकाणी वर्षाव होतो. मुक्तागिरीला पूर्ण पाहण्यासाठी ४०० पायऱ्या व उतरताना ५०० पायऱ्या लागतात. ४०० फुटांवरून कोसळणारा धबधबा मनाला भुरळ घालतो. संपूर्ण लाकडापासून तयार केलेला रथ यात्रेच्या वेळी बाहेर काढला जातो.

दिवाळीनंतरच्या येणाऱ्या पहिल्या पौर्णिमेला या ठिकाणी मोठी जत्रा भरते. मुक्तागिरीचे संपूर्ण व्यवस्थापन हे पूर्वी धर्मपीठाकडे होते. श्री पद्मानंदजी स्वामीजी त्या धर्मपीठाचे पीठाधीश होते. भक्तांसाठी येथे भक्तनिवासाची व्यवस्था आहे. भोजनालयसुद्धा सुरू राहते. आजही या ठिकाणी जैन धर्माच्या ऋषिमुनींची ये-जा सुरू राहते. सध्या या ठिकाणी पर्यटकांसह भक्तांची गर्दी बघायला मिळते. जैनांची काशी म्हणून मुक्तागिरीची सर्वत्र ओळख आहे.

मुक्तागिरीला जाण्याचा मार्ग

  • अमरावती ते परतवाडा पन्नास किलोमीटर

  • परतवाडा ते खरपी आठ किलोमीटर

  • खरपी ते मुक्तागिरी सात किलोमीटर

  • या ठिकाणी येण्यासाठी राज्य व आंतरराज्य बसगाड्यासुद्धा सुरू असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com