मुकुल वासनिक व नितीन राऊत समर्थक भिडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

नागपूर - जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत रामटेक लोकसभेच्या उमेदवारीवरून माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक आणि राज्यातील माजी मंत्री नितीन राऊत यांचे समर्थक आपसांत भिडले. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. राऊत समर्थक गोंधळ घालून निघून गेल्यानंतर जिल्हा निवड समितीने मुकुल वासनिक यांच्या नावाचा प्रस्ताव प्रदेश कमिटीकडे पाठविल्याचे कळते. 

नागपूर - जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत रामटेक लोकसभेच्या उमेदवारीवरून माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक आणि राज्यातील माजी मंत्री नितीन राऊत यांचे समर्थक आपसांत भिडले. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. राऊत समर्थक गोंधळ घालून निघून गेल्यानंतर जिल्हा निवड समितीने मुकुल वासनिक यांच्या नावाचा प्रस्ताव प्रदेश कमिटीकडे पाठविल्याचे कळते. 

प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार जिल्हानिहाय लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. आलेल्या अर्जातून तीन नावांची शिफारस जिल्हा निवड समितीला प्रदेश कमिटीकडे पाठवायची होती. रामटेक लोकसभेकरिता एकून तीन इच्छुकांनी अर्ज केले होते. त्यात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच माजी मंत्री  नितीन राऊत, जी. डी. जांभूळकर आणि महादेव नगराळे यांचा समावेश आहे. 

जिल्हा निवड समितीची बैठक गुरुवारी बोलावण्यात आली होती. बैठक सुरू होताच नितीन राऊत समर्थकांनी त्यांनाच उमेदवारी द्यावी जोरदार मागणी केली. त्याकरिता घोषणाबाजीही केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. घोषणाबाजी झाल्यानंतर  राऊत व केदार समर्थक बैठकीतून निघून गेले. त्यामुळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी आमदार केदार यांना सांगून जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना परत बोलाविले. 

गोंधळ नव्हे, चर्चा झाली
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गोंधळ नव्हे तर चर्चा झाल्याचे सांगितले. बैठकीला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, जि. प. सदस्य, विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले होते. उमेदवारी कोणाला द्यावी याविषयी सर्वांचे मत जाणून घेतले. सर्वांच्या मतांचा समावेश असलेला अहवाल प्रदेश समितीकडे प्रदेशकडे पाठविल्याचे मुळक यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. बहुतांश कार्यकर्त्यांनी मुकुल वासनिक लढणार नसतील तर नितीन राऊत यांचा विचार करावा, असे मत मांडल्याचेही मुळक यांनी सांगितले.

राऊतांचा रामटेकशी काय संबंध? 
जिल्हा निवड समितीची बैठक चर्चेसाठी बोलावण्यात आली होती. येथे उमेदवारी वाटप केली जाणार नव्हती. मुकुल वासनिक रामटेकचे खासदार होते. त्याकाळात ते केंद्रात मंत्री होते. अनेक विकासकामे त्यांच्या कार्यकाळात रामटेकमध्ये झाली. त्यामुळे उमेदवारीवर त्यांचाच पहिला दावा आहे. नितीन राऊत यांचा रामटेक लोकसभेशी काय संबंध असा सवाल ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukul Wasnik and Nitin Raut Supporters clashed