मुंबई दुरांतो रद्द

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

नागपूर : मुसळधार पावसामुळे बुधवारी मुंबईची तुंबापुरी झाली. त्याचा फटका रेल्वे वाहतुकीलासुद्धा बसला आहे. गुरुवारी नागपूरहून रवाना होणारी मुंबई दुरांतो एै ृनवेळी रद्द करण्यात आली. सोबतच नागपूरमार्गे मुंबईकडे रवाना झालेल्या रेल्वेगाड्या पूर्वीच थांबवून घेण्यात आल्या आहेत. त्यातील विदर्भ, शालीमार व गीतांजली एक्‍स्प्रेससह एकूण पाच गाड्या थांबविलेल्या ठिकाणावरूनच परतीच्या प्रवासाला निघतील. याशिवाय दोन गाड्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने सोडण्यात येणार आहेत. गुरुवारी रात्री 8.40 वाजता नागपूर स्थानकाहून रवाना होणारी नागपूर - मुंबई दुरांतो रद्द करण्याची घोषणा सायंकाळी करण्यात आली.

नागपूर : मुसळधार पावसामुळे बुधवारी मुंबईची तुंबापुरी झाली. त्याचा फटका रेल्वे वाहतुकीलासुद्धा बसला आहे. गुरुवारी नागपूरहून रवाना होणारी मुंबई दुरांतो एै ृनवेळी रद्द करण्यात आली. सोबतच नागपूरमार्गे मुंबईकडे रवाना झालेल्या रेल्वेगाड्या पूर्वीच थांबवून घेण्यात आल्या आहेत. त्यातील विदर्भ, शालीमार व गीतांजली एक्‍स्प्रेससह एकूण पाच गाड्या थांबविलेल्या ठिकाणावरूनच परतीच्या प्रवासाला निघतील. याशिवाय दोन गाड्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने सोडण्यात येणार आहेत. गुरुवारी रात्री 8.40 वाजता नागपूर स्थानकाहून रवाना होणारी नागपूर - मुंबई दुरांतो रद्द करण्याची घोषणा सायंकाळी करण्यात आली. गाडीच्या 645 प्रवाशांना अचानक गाडी रद्द करण्यात आल्याचे मॅसेज प्राप्त झाले. तिकीट रद्द करण्यासह अधिक माहिती देण्यासाठी नागपूर स्थानकावर विशेष बुथ सुरू करण्यात आले होते. 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्‍स्प्रेस गुरुवारी नाशिक रोड येथून रवाना झाली. बुधवारी रवाना झालेली 12106 गोंदिया-मुंबई विदर्भ एक्‍स्प्रेस भुसावळपर्यंतच धावली. यामुळे 12105 मुंबई-गोंदिया विदर्भ एक्‍स्प्रेस भुसावळ येथूनच रवाना झाली. 18029 लोकमान्य टिळक टर्मिनस-शालीमार एक्‍स्प्रेस आज इगतपुरी येथून रवाना झाली. 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्‍स्प्रेसला आज नाशिक रोड येथेच थांबविण्यात आले. याशिवाय बुधवारी रवाना होणारी 12261 मुंबई-हावडा दुरांतो एक्‍स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा सहा तास उशिरा आज रवाना झाली. बुधवारी रवाना होणारी 12289 मुंबई-नागपूर दुरांतो एक्‍स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा 6 तास 40 मिनिटे उशिरा रवाना झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Duranto canceled