esakal | "एपीएमसी'त महाविकास विरुद्ध भाजप 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

देशातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे दिग्गजांचे लक्ष याकडे केंद्रीत झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितींना राज्यशासनाने सहा महिने मुदतवाढ दिली आहे.

"एपीएमसी'त महाविकास विरुद्ध भाजप 

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : सहकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. अमरावती महसूूल विभागातून दोन जागांसाठी 26 अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर अजूनही सात उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात कायम आहेत. अमरावती विभागातून महाविकास आघाडीतर्फे यवतमाळचे प्रवीण देशमुख तसेच मेहकरचे माधवराव जाधव यांचे नाव निश्‍चित केले असून भाजपनेही शड्डू ठोकल्याने चुरशीची निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. 


हे वाचा—परीक्षा एका दिवसावर, केंद्रावर पोहोचल्याच नाहीत प्रश्‍नपत्रिका 

सहा महिने मुदतवाढ

देशातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे दिग्गजांचे लक्ष याकडे केंद्रीत झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितींना राज्यशासनाने सहा महिने मुदतवाढ दिली आहे. असे असले तरी मुंबई बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्याप्रमाणेच होणार आहे. मुबंई बाजार समितीवर संचालक म्हणून आपली वर्णी लागावी, यासाठी आता चढाओढ सुरू झाली आहे. अमरावती महसूल विभाग मतदारसंघातील दोन जागांसाठी यावेळी तब्बल 26 अर्ज दाखल झाले आहेत. शनिवार (ता.15) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. 19 उमेदवारांनी माघार घेतली. यानंतरही सात उमेदवार आखाड्यात आहेत. मुबंई बाजार समितीतही महाविकास आघाडीचे पॅनेल झाले आहे. अमरावती विभागात सात उमेदवार रिंगणात असल्याने काट्याची टक्कर होण्याची शक्‍यता आहे. महाविकास आघाडी असली तरी सहकारात पक्ष नसतो, अशी चर्चा सुरू झाल्याने नेमका अर्थ काय? याची चर्चा आता रंगू लागली आहे. 

हे वाचा— लुप्त होणाऱ्या लिपींचे संवर्धन गरजेचे 

महाविकास आघाडीचे उमेदवार 

अमरावती विभागातून प्रवीण देशमुख व माधवराव जाधव, नागपूर विभागातून सुधीर कोठारी व कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकुमचंद आमधरे, औरंगाबाद विभागातून अशोक डक व वैजनाथ शिंदे, नाशिक विभागातून रितेश पाटील व जयदत्त होळकर, पुणे विभागातून धनंजय पाडकर व बाळासाहेब सोळसकर यांचा समावेश आहे.