esakal | काँग्रेसमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. त्यामुळे अनेक पक्षांचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत.
sakal

बोलून बातमी शोधा

गडचिरोली पालिकेवर काँग्रेसचा झेंडा हेच आपले ध्येय

गडचिरोली पालिकेवर काँग्रेसचा झेंडा हेच आपले ध्येय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : आगामी काळात नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला एकहाती सत्ता स्थापन करायची आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुढाकार घेणे गरजेचे आहे. काँग्रेसमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. त्यामुळे अनेक पक्षांचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत. त्यांना विश्वासात घेऊन पक्ष संघटन वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे. पालिकेवर काँग्रेसचा झेंडा हेच आपले ध्येय आहे, असे मत राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. (Municipal-council-elections-Vijay-Wadettiwar-Congress-political-news-nad86)

गडचिरोली दौऱ्यादरम्यान मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांबद्दल मार्गदर्शन केले. बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जीवन पाटील नाट, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सोशल मीडिया प्रदेश सदस्य नंदू वाईलकर, गौरव एनप्रेडिवार, सुरेश भांडेकर, कुणाल ताजणे, श्रीनिवास दुल्लमवार, नितीन राऊत, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा: निर्बंधात शिथिलता सोमवारपासून? चेहऱ्यावर फुलणार हास्य

आगामी निवडणुकीत काँग्रेसला यश संपादन करायचे आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपलेच काम समजून पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. निष्ठावंत कार्यकर्ते समोर आल्यास निश्चितच यश संपादन करता येऊ शकते. हे लक्षात घेऊन प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या वॉर्डातील बूथ मजबूत करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले.

माजी सभापती, सदस्यांचा पक्ष प्रवेश

बैठकीत शहर काँग्रेसचे अध्यक्ष सतीश विधाते यांच्या नेतृत्वात गडचिरोली नगर परिषदेचे माजी सभापती अजय भांडेकर व पंचायत समितीचे माजी सदस्य नामदेव उडान, युवा कार्यकर्ते किशोर भांडेकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भविष्यात आपण काँग्रेसचे ध्येय, धोरण समजून घेऊन परिसरातील काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करणार असल्याची ग्वाही काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे अजय भांडेकर, नामदेव उडान, किशोर भांडेकर यांनी दिली.

(Municipal-council-elections-Vijay-Wadettiwar-Congress-political-news-nad86)

loading image
go to top