esakal | बिर्याणी खाण्यासाठी आलेल्या त्या काँग्रेस कार्यकर्त्यावर अचानक झाला बेछूट गोळीबार;गॅंगवॉर भडकण्याची भीती!
sakal

बोलून बातमी शोधा

crime

बहुरिया गुन्हेगारी वर्तुळात सक्रिय असला तरी त्याला मानणारा मोठा वर्ग होता. काही दिवसांपासून तो कॉंग्रेसमध्ये सक्रिय झाला होता.

बिर्याणी खाण्यासाठी आलेल्या त्या काँग्रेस कार्यकर्त्यावर अचानक झाला बेछूट गोळीबार;गॅंगवॉर भडकण्याची भीती!

sakal_logo
By
मंगेश बेले

बल्लारपूर( जि.चंद्रपूर) ः  बिर्याणी खाण्यासाठी आलेल्या बहुरियावर दुचाकीने आलेल्या अमन आणि त्याच्या साथीदारांनी बेछूट गोळीबार केला. यात बहुरिया जागीच ठार झाला. त्यानंतर त्याच्या समर्थकांनी पोलिस ठाण्यासमोर चांगलाच गोंधळ घातला.

रविवारी (ता. 9) चंद्रपुरात शवविच्छेदन झाल्यानंतर हजारो लोकांच्या उपस्थितीत बहुरियावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बहुरिया गुन्हेगारी वर्तुळात सक्रिय असला तरी त्याला मानणारा मोठा वर्ग होता. काही दिवसांपासून तो कॉंग्रेसमध्ये सक्रिय झाला होता.

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूविक्री संघटितरीत्या सुरू झाल्यानंतर कॉंग्रेसचा कार्यकर्ता सूरज बहुरिया याचा पहिला बळी गेला. बहुरिया यांच्या हत्याकांडामागे "दारू' विक्रीतील वर्चस्वाची लढाई आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना 15 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. या हत्याकांडाच्या पार्श्‍वभूमीवर गॅंगवार भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बल्लारपुरातील वर्दळीच्या मुख्यमार्गावर गोळ्या झाडून शनिवारी (ता. 8) दुपारी 2 वाजता बहुरीया यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर अवघ्या काही तासांत अमन अंदेवार (वय 29), आल्फ्रेड लॉजीट्‌स ऍथोनी (वय 19), प्रणय राजू  सैगल (वय 22), बादल वसंत हरणे (वय 19), अविनाश बोबडे (वय 22) यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

सूरज बहुरिया गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. तो दोन वर्ष तडीपार होता. कोळसा तस्करीत तो गुंतला होता. काही महिन्यांपूर्वीच त्याने दारू तस्करीत पाऊल ठेवले. अमन अंदेवार पूर्वीपासूनच दारू तस्करीत सक्रिय होता. यातूनच त्यांच्यात वैर निर्माण झाले. दोघांमध्ये अनेकदा वादही झाले. त्यामुळे एकमेकांचा काटा काढण्याची संधी ते दोघेही शोधत होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, अंदेवार यानेच बहुरियाचा अडथळा आपल्या मार्गातून दूर केला. संघटित दारूविक्रीतील स्पर्धेत त्याचा बळी गेला.

सविस्तर वाचा - भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी दिले ‘त्या' प्रकरणावर स्पष्टीकरण; म्हणाले...

दारूतस्करीची पाळेमुळे सर्वत्र खोलवर रुजली आहे. त्यामुळे आता या क्षेत्रात टोळीयुद्धाची भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हत्याकांडानंतर शनिवारी रात्री बहुरियाच्या समर्थकांनी मुख्य आरोपी अमन अंदेवार यांच्या घरावर हल्ला केला. त्यात त्याची आई गंभीररीत्या जखमी झाली. अटकेतील पाचही आरोपी बल्लारपुरातील आहेत.  

संपादन - स्वाती हुद्दार

loading image