esakal | दीड लाखाच्या बदल्यात जीव! गोंदियात ॲसिड टाकून तरुणाचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

दीड लाखाच्या बदल्यात जीव! गोंदियात ॲसिड टाकून तरुणाचा खून

दीड लाखाच्या बदल्यात जीव! गोंदियात ॲसिड टाकून तरुणाचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : ॲसिड टाकून एका तरुणाचा निर्दयपणे खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. १२) सकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गोंदिया-कवलेवाडा रस्त्यावरील कोठारी गॅस एजन्सीच्या गोदामासमोर तरुणाचा मृतदेह पडून होता. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ व्यक्त केली जात आहे. कुलदीप हिरालाल बिसेन (वय २१, रा. बरबसपुरा बटाणा) असे मृताचे नाव आहे. (Murder-of-a-young-man-by-throwing-acid-in-Gondia)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप शहरातील एका ड्रायव्हिंग शाळेत काम करीत होता. त्याच्याकडून अपघात झाला होता. या अपघातात दुसऱ्या वाहनचालकाचे जवळपास एक लाख ५० हजारांचे नुकसान झाले होते. हे नुकसान भरून देण्याच्या मागणीवरून त्याचा मालकाशी वाद झाल्याचे समोर आले आहे. ७ जुलै रोजी मालकालाच भेटायला कुलदीप गेला होता, तो परतलाच नाही. तो ज्या वाहनाने गेला होता, ते वाहन गॅस एजन्सीच्या गोदामासमोर असलेल्या परिसरात आढळून आले.

हेही वाचा: चार दिवसांचे आश्वासन ७२ तासांतच पूर्ण; हल्लेखोर वाघ जेरबंद

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे, गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय राणे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिस तपास सुरू आहे.

(Murder-of-a-young-man-by-throwing-acid-in-Gondia)

loading image