बोनसच्या पैशावरून आईचा खून; आरोपी मुलाला अटक | Murder | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

बोनसच्या पैशावरून आईचा खून; आरोपी मुलाला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सालेकसा - धानाच्या बोनसचे पैसे मला का देत नाही, असे म्हणत मुलाने आईच्या डोक्यावर हातोडीने प्रहार केला. यात गंभीररित्या जखमी झालेल्या आईचा गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मोकाशीटोला येथे शुक्रवारी (ता. १२) घडली.

उर्मिला अनंतकुमार माहुर्ले (वय ५३) असे मृताचे, तर नीलेश अनंतकुमार माहुर्ले (वय २७, दोघेही रा. मोकाशीटोला) असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा: देहव्यापार करवून घेणाऱ्या महिलेला अटक; चार जणींची सुटका

खरिपातील धानाचा बोनस काही दिवसांपूर्वी शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. उर्मिला माहुर्ले यांनाही बोनसची रक्कम मिळाली. दरम्यान, शुक्रवारी (ता. १२) दुपारी १२.३० च्या सुमारास आरोपी मुलगा नीलेश याने आई उर्मिलासोबत बोनसच्या पैशावरून वाद घातला. मला बोनसचे पैसे का देत नाही, असे म्हणून रागाच्या भरात त्याने आईच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार केला. यात रक्ताच्या थारोड्यात उर्मिला पडली. गंभीर जखमी झालेल्या उर्मिलाला गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याच दिवशी दुपारी साडेतीनच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सालेकसा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलगा नीलेशला अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार अरविंद राऊत करीत आहेत.

loading image
go to top