देहव्यापार करवून घेणाऱ्या महिलेला अटक; चार जणींची सुटका | Prostitution | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prostitution

देहव्यापार करवून घेणाऱ्या महिलेला अटक; चार जणींची सुटका

गोंदिया - महावीर कॉलनी, रिंगरोड कुडवा, गोंदिया येथील मंत्रा फॅमिली सलून, मेकअप स्टुडिओ अँड स्पा (ब्युटीपार्लर) येथे सुरू असलेल्या देहव्यापारावर छापा टाकून पोलिसांनी देहव्यापार करवून घेणाऱ्या महिलेला अटक केली. यातील पीडित चार महिलांची जामिनावर सुटका केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (ता. १२) करण्यात आली.

मंत्रा फॅमिली सलून, मेकअप स्टुडिओ अँड स्पा (ब्युटीपार्लर) येथे अवैधरित्या देहव्यापार चालत असल्याची गुप्त माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांना अंगूर बगीचा गोंदिया येथील एक महिला सदर ब्युटीपार्लर चालवत असल्याची खात्री पटली. त्यानंतर त्यांनी बहुउद्देशीय संस्थेच्या एका महिला सामाजिक कार्यकर्तीला सोबत घेऊन संबंधित ब्युटीपार्लरवर छापा टाकला. यावेळी चार पीडित महिला आढळून आल्या.

हेही वाचा: नागपूर पोलिस अलर्ट; शहरात फ्लॅग मार्च

घटनास्थळावरून एक मोबाईल, सहा हजार १२० रुपये नगदी असा एकूण ११ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पीडित महिलांना पोलिस ठाण्यात आणले. त्यांची विचारपूस केली. दरम्यान, नायक पोलिस शिपाई आशीष अग्नीहोत्री यांनी शनिवारी (ता. १३) दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ब्युटीपार्लर चालविणाऱ्या महिलेस अटक केली. पीडित महिलांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कठाळे व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

loading image
go to top