सोडचिठ्ठीचे प्रकरण न्यायालयात; पतीने ठेचून केली पत्नीची हत्या

Murder of wife in wardha district
Murder of wife in wardha districtMurder of wife in wardha district

वर्धा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने दगडाने आणि बॅटने ठेचून हत्या (Murder) केल्याची घटना मंगळवारी (ता. १२) सायंकाळच्या सुमारास भूगाव येथील कंपनीसमोरील परिसरात घडली. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इम्रान खान (रा. लेकुर्ली, जि. नांदेड) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर पूजा गजानन बोंबले (२१, रा. भूगाव) असे मृत पत्नीचे नाव आहे. (Murder of wife in wardha district)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा आणि इम्रान यांच्यात प्रेमसंबंध होते. यानंतर त्यांनी विवाह केला. विवाहानंतर पूजाचे नाव बदलवून कैकशा करण्यात आले. दोघे पहिले पुलगाव नंतर भूगाव येथील कंपनीच्या गेटसमोर असलेल्या परिसरात वास्तव्यास होते. सर्व सुरळीत असताना त्यांच्या प्रेमात संशय (Doubt over character) शिरल्याने खटके उडू लागले. यातून रोजच भांडण होऊ लागले. यामुळे पूजा ऊर्फ कैकशा तिच्या आईसोबत राहत होती.

Murder of wife in wardha district
नरेंद्र मोदी म्हणाले, भारत जगाला पोसण्यासाठी तयार; पण...

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने इम्रानने थेट दगडाने आणि बॅटने पूजावर प्रहार केला. मारहाणीत पूजाने केलेल्या आरडाओरडाने आजूबाजूचे नागरिक गोळा झाले. त्यांना पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांनी दिली. माहिती मिळताच सावंगीचे ठाणेदार धनाजी जळक कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले. यावेळी पाहणी केली असता पूजाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सुरू होते सोडचिठ्ठीचे प्रकरण

प्रेमविवाह करून त्यांच्या सुरू असलेल्या वादातून दोघांनाही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. पती इम्रान हा दारूच्या आहारी गेला असून, नांदेड येथून येणे जाणे सुरू होते. यातूनच त्याने पूजाच्या चारित्र्यावर संशय (Doubt over character) घेत हत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com