वृद्धेच्या मृत्यूने खळबळ, धारदार शस्त्रांसह दगडाने वार

Murder of an old women by throwing stones
Murder of an old women by throwing stones

अमरावती : वरुड तालुक्‍यात शेंदुरजनाघाट ठाण्याच्या हद्दीत वाई शिवारात एका वृद्धेचा खून करण्यात आल्याची घटना उजेडात आली असून, या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली आहे. रमिया दलसू युवनाते (वय 70 वर्षे, रा. पेंडोणी, पांढुर्णा) असे मृत वृद्धेचे नाव आहे.

मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात पांढुर्णा तालुक्‍यात पेंडोणी येथील कलावती देवराव युवनाते (वय 37) या महिलेच्या पतीच्या मालकीचे पावणे तीन एकर शेत शेंदुरजनाघाट ठाण्याच्या हद्दीत वाई येथे आहे. हे शेत मध्यप्रदेशच्या सीमेपासून दोन किलोमीमिटर अंतरावर आहे. शेतात रमिया युवनाते ही वृद्धा झोपडीत राहत होती. त्याचठिकाणी त्यांच्या कोंबड्या व इतर जनावरे होती. वृद्धेसोबत नेहमीच लहान नात काजल राहत असे. 

घटनेच्या आदल्या दिवशीच कलावती ही लहान मुलीला घेऊन जवळच्या असलेल्या गावी निघून गेली होती. रमिया हिच्या नावाने बॅंकेत जमा असलेले पैसे काढण्यासाठी तिला बॅंकेत घेऊन जायचे होते. त्यामुळे मुलगा देवराव युवनाते हा मंगळवारी (ता. आठ). शेतात गेला असता त्याला वृद्ध आईचा कुणीतरी खून केल्याचे निदर्शनात आले. वृद्धेवर दगडाने व धारदार शस्त्राने कुणीतरी वार करून तिचा खून केल्याचे लक्षात आले. मृत वृद्धेची सून कलावती युवनाते हिने शेंदुरजनाघाट ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
 

तपास सुरू
सत्तर वर्षीय वृद्धेच्या खुनाचे कारण व या प्रकरणात सहभागी मारेकरी अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. प्रत्येक बारकावे पोलिसांकडून तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 मयुर गेडाम, पोलिस निरीक्षक, शेंदुरजनाघाट ठाणे.



आरोपींकडून घरफोडीची कबुली

स्थानिक गुन्हेशाखेने अटक केलेल्या तिघांनी चांदुररेल्वे व कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या दोन घटनांची कबुली दिली. अटकेतील तिघेही अमरावती शहराच्या बडनेरा येथील रहिवासी आहेत. शेख सलीम शेख युसूफ (वय 28, रा. अलमासनगर), शेख अलीम शेख तालीम (वय 28, रा. चंद्रानगर) व शहबाज खान हुसेन खान (वय 25, रा. चमननगर) अशी अटकेतील तिघांची नावे आहे. दोन्ही घटनेतील 32 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. चांदुररेल्वे हद्दीत 29 ऑगस्ट 2020 रोजी तर, कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीत 14 ऑगस्ट रोजी या घटना घडल्या होत्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com