सेवानिवृत्त नायब तहसीलदारांचा खून; पैशाच्या लालसेतून भाच्यानेच घडविले हत्याकांड

Murder of retired Deputy Tehsildar Yavatmal crime news
Murder of retired Deputy Tehsildar Yavatmal crime news
Updated on: 

महागाव (जि. यवतमाळ) : तहसील कार्यालयातून वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झालेले नायब तहसीलदार मोहन नामदेव पेंदौर (वय ५९) यांचा निर्घृण खून करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी महागाव ते फुलसावंगी रस्त्यावर पिंपळगाव फाट्यावर हा थरार घडला. पैशाच्या लालसेतून सख्ख्या भाच्यानेच मोहन पेंदौर यांना ठार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पवन श्रीराम मंगाम (वय ३३) असे संशयित भाच्याचे नाव आहे. तो लोहारा (यवतमाळ) येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन पेंदौर हे महागाव येथे नायब तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त झाले. ते मुळचे यवतमाळ येथील रहिवासी होते. पेंदौर यांना मुलबाळ नाही. संशयित भाचा पवन मंगाम हा मोहन पेंदौर यांना सातत्याने पैशाची मागणी करायचा. वृद्धापकाळी मीच सेवा करणार, त्यामुळे संपत्ती माझ्या नावे करण्याची धमकी पवन सातत्याने देत होता. परंतु, मोहन पेंदौर मात्र भाच्याला दाद देत नव्हते. यावरून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते.

पवन महागाव येथे मामाच्या क्वार्टरवर आला. मामाचा काटा काढण्याचा विचार त्याच्या मनात होता. घरातील कैची त्याने खिशात लपविली व स्विफ्ट डिझायर (क्र. एमएच २० सीएच ०८४०) मध्ये मोहन पेंदौर यांना घेऊन तो सायंकाळी फुलसावंगी रस्त्याने निघाला. पिंपळगाव फाट्यावर गाडी थांबवून त्याने पैशासाठी हुज्जत घातली व धारदार कैचीने सपासप वार करून मोहन पेंदौर यांचा निर्घृण खून केला. त्यानंतर मृतदेह रस्त्यालगत फेकून त्याने यवतमाळकडे पलायन केले.

माजी नायब तहसीलदारांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे कळताच यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलिस आणि तहसील प्रशासन लगेच घटनास्थळी पोचले. पेंदौर यांच्या पोटावर व छातीवर मोठे घाव होते. त्यामुळे आरोपीचा छडा लावण्याचे आव्हान होते.

यात वेगाने तपास करून एलसीबीने रात्रीच पवन मंगाम याला यवतमाळ येथून ताब्यात घेतले व महागाव पोलिसांच्या स्वाधीन केले. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी वालचंद मुंढे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विलास चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक बालाजी शेगेपल्लू, राहुल वानखेडे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com