esakal | गळा आवळून युवकाचा खून : मृतदेह पुसलाच्या पाझर तलावात फेकला
sakal

बोलून बातमी शोधा

crime

गळा आवळून युवकाचा खून : मृतदेह पुसलाच्या पाझर तलावात फेकला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहराच्या वलगाव मार्गावरील रहिवासी युवकाचा शेंदुरजनाघाट परिसरात गळा आवळून खून करण्यात आला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेंदुरजनाघाट परिसरात एका तलावात फेकण्यात आल्याची खळबळजनक घटना आज उजेडात आली.

शुक्रवारी (ता. 3) ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. फईमोद्दीन नसरुद्दीन काजी (वय 21, रा. अबुबकर कॉलनी, वलगाव मार्ग, अमरावती) असे खून झालेल्या युवकाचे नाव असल्याचे शेंदुरजनाघाटचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांनी सांगितले. घटनेच्या एक दिवसांपूर्वी पुसला गावातील पोलिस पाटील सारिका विलास डोंगरे यांनी घटनेची माहिती शेंदुरजनाघाट पोलिसांना दिली.

हेही वाचा: 'कोल इंडिया'मध्ये नोकरीची उत्तम संधी! 9 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

पाझर तलावात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगतांना दिसत होता. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात फईमोद्दीन यांचा आधी गळा आवळून खून केला व त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पाझर तलावात फेकण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. फईमोद्दीन यांच्या हत्येचे कारण आणि त्याचे मारेकरी यांचा शोध घेण्याचे काम शेंदुरजनाघाट पोलिसांसह स्थानिक गुन्हेशाखेने सुरू केले.

सदर युवक हा शिक्षण देण्याचे काम करीत होता. त्याचा खून नेमका कुठे झाला. याचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांपुढे आहे.

- देवेंद्र ठाकूर, ठाणेदार, शेंदुरजनाघाट ठाणे.

loading image
go to top