
वाकाटकपुर्व राजवटीपासून वाशीम जिल्ह्यातील कारंजा किंवा लाडाचे कारंजे ही संपन्न व्यापारी पेठ होती. देवगिरीचे यादव, मोगल, निजामशाही, इमादशाही, नागपूरकरभोसले ते इंग्रज राजवटीचा काळ या शहराने अनुभवला आहे.
वाशीम : कस्तुरीमृगाच्या बेंबीत निघणारी कस्तुरी सोन्यापेक्षाही महाग आहे. आता तर ती फक्त पुस्तकात वाचावयास मिळते. 50 उंटावर लादलेल्या याच कस्तुरीने चक्क हवेली बांधल्याचा इतिहास वाशीम जिल्ह्यातील कारंजाच्या संपन्नतेची साक्ष देत आहे. काळाच्या ओघात ही कस्तुरीची हवेली नामशेष झाली असली तरी तेथील मातीचा सुगंध घेण्यासाठी अजूनही पर्यटक या हवेलीकडे येतात.
वाकाटकपुर्व राजवटीपासून वाशीम जिल्ह्यातील कारंजा किंवा लाडाचे कारंजे ही संपन्न व्यापारी पेठ होती. देवगिरीचे यादव, मोगल, निजामशाही, इमादशाही, नागपूरकरभोसले ते इंग्रज राजवटीचा काळ या शहराने अनुभवला आहे. म्हणूनच कारंजात आजही दिल्लीवेस, द्वारव्हावेस, मंगरूळवेस व पोहा वेस या चार वेशी या शहराच्या संपन्नतेची साक्ष देत आजही उभ्या आहेत. अहमदनगरच्या बादशाहची मुलगी इमादशाहला दिली होती.
महत्त्वाची बातमी - अॅड.प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले पत्र अन् म्हणाले...
अहमदनगरच्या निजामशाहाने कारंजा हे गाव आपल्या मुलीला आंदण म्हणून दिल्याचा उल्लेख आहे. जुन्या कागदपत्रामध्ये बिबीचे कारंजे असाही या गावाचा उल्लेख आहे. या नगरीने अलोट ऐश्वर्यसंपन्नता अनुभवली आहे. याची साक्ष म्हणून या शहरात असलेली कस्तुरीच्या हवेलीचा उल्लेख येत 19 पिढ्यांच्या आधी लेकुर संघई हे बडे प्रस्थ कारंजात होते. लेकुर संघई यांच्या हवेलीचे बांधकाम सुरू असताना उंटावरून कस्तुरी घेवून जाणार्या व्यापार्याला लेकुर संघईने कस्तुरीचा भाव विचारला मात्र चिखलात उभा असलेला हा माणूस काय कस्तुरी घेईल असा विचार करून या व्यापार्याने त्यांची संभावना केली.
हेही वाचा - कापूस खरेदी केंद्रांना लागली कीड! शासकीय धोरण नडले, 23 हजाराहून अधिक शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून
मात्र इरेस पेटून लेकुर संघई यांनी या 50 उंटाच्या पाठीवर पखालीमध्ये लादलेली कस्तुरी या व्यापार्याला हवेलीच्या बांधकामासाठी केलेल्या चिखलात ओतण्यास सांगितले. या व्यापार्याला सोन्याची अकबरकालीन नाणी देवून वाटेस लावले. गेल्या 19 पिढ्यांपासून या कस्तुरीच्या हवेलीची कथा सांगितली जाते. मातीत कस्तुरी टाकल्यानंतर पांढरी माती सुगंधित झाली. या मातीचे पेंड करून ही हवेली बांधण्यात आली.
शेकडो वर्ष या हवेलीचा सुंगध दरवळत होता. आता मात्र ही हवेली नामशेष झाली आहे. हवेलीच्या जागी मात्र मातीचे ढिगाने अस्तित्वात आहे. पर्यटकांसाठी ही हवेली कधीकाळी आकर्षण होती. सध्या या हवेलीची अस्तित्वच शून्य झाले आहे. तळघर, बारा दाराची विहीर, भुयारी वाटा मातीच्या ढिगार्याखाली आपला जुना इतिहास सांगत आहेत. किरण संघई कस्तूरीवाले हे या संघई घराण्याचे 19 वे वंशज कारंजात वास्तव्यास आहेत.