Dipali madane
sakal
कारंजा - कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर येथे आठ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण आता खुनाच्या गुन्ह्यापर्यंत पोहोचले आहे. विवाहबाह्य संबंधातील अडथळा दूर करण्याच्या उद्देशाने जवान असलेल्या पतीने ६ ऑगस्ट रोजी दुपारी सासू-सासऱ्यांच्या संगनमताने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पती ज्ञानेश्वर मदने याला अटक केली आहे. आरोपी पतीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.