esakal | भंडारा जिल्ह्यातील नगरपंचायतीला लागले निवडणुकीचे वेध, आरक्षण झाले जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

भंडारा जिल्ह्यातील तीन मोठ्या गावांत नगरपंचायतींची स्थापना झाली आहे. आता त्या नगरपंचायतींना पहिले पाच वर्षे पूर्ण होत आहेत. सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजण्याची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे या तीनही नगरपंचायतीत प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत.

भंडारा जिल्ह्यातील नगरपंचायतीला लागले निवडणुकीचे वेध, आरक्षण झाले जाहीर

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

भंडारा : जिल्हा परिषद गटांचे आरक्षण बदलल्याने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यापाठोपाठ मंगळवारी मोहाडी, लाखनी व लाखांदूर नगरपंचायतीत प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामुळे नगरपंचायत क्षेत्रातही निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. राजकीय समीकरणे व उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे.

जिल्ह्यातील तीन मोठ्या गावांत नगरपंचायतींची स्थापना झाली आहे. आता त्या नगरपंचायतींना पहिले पाच वर्षे पूर्ण होत आहेत. आता सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजण्याची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे या तीनही नगरपंचायतीत प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत.

मोहाडी नगरपंचायतीत 17 प्रभाग आहेत. पंचायत समितीच्या सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रभाग 1, 2 नामाप्र महिला, प्रभाग 3,4 सर्वसाधारण, प्रभाग 5 अनुसूचित जाती, प्रभाग 6 सर्वसाधारण महिला, प्रभाग 7 नामाप्र महिला, प्रभाग 8 अनुसूचित जमाती, प्रभाग 9 नामाप्र, प्रभाग 10 अनुसूचित जमाती महिला, प्रभाग 11, 12 सर्वसाधारण महिला, प्रभाग 13 नामाप्र, प्रभाग 14 सर्वसाधारण महिला, प्रभाग 15 अनुसूचित जमाती महिला, प्रभाग 16 व 17 सर्वसाधारण राहणार आहेत.

जाणून घ्या :  गोंदियात जहाल नक्षलवाद्याला अटक, १० वर्षांपासून होता फरार

लाखनी येथे प्रभाग 1 अनुसूचित जाती, प्रभाग 2 सर्वसाधारण(महिला) प्रभाग 3 सर्वसाधारण, प्रभाग 4 नामाप्र, प्रभाग 5 सर्वसाधारण, प्रभाग 6 अनुसूचित जाती (महिला), प्रभाग 7 अनुसूचित जाती (महिला), प्रभाग क्रमांक 8 नामाप्र (महिला), प्रभाग 9, 10 सर्वसाधारण(महिला), प्रभाग 11 नामाप्र (महिला), प्रभाग 12 सर्वसाधारण, प्रभाग 13 नामाप्र (महिला), प्रभाग 14 सर्वसाधारण, प्रभाग 15 अनुसूचित जमाती(महिला), प्रभाग 16 सर्वसाधारण, प्रभाग 17 नामाप्र असे आरक्षण जाहीर झाले आहे.

लाखांदूर येथे प्रभाग 1 अनुसूचित जाती, प्रभाग 2 सर्वसाधारण महिला, प्रभाग 3 नामाप्र, प्रभाग 4 सर्वसाधारण, प्रभाग 5 अनुसूचित जाती महिला, प्रभाग 6 नामाप्र महिला, प्रभाग 7 सर्वसाधारण, प्रभाग 8 नामाप्र महिला, प्रभाग 9 सर्वसाधारण महिला, प्रभाग 10 नामाप्र महिला, प्रभाग 11 नामाप्र, प्रभाग 12, 13, 14 नामाप्र महिला, प्रभाग 15, 16 सर्वसाधारण,प्रभाग 17 अनुसूचित जाती महिला असे आरक्षित करण्यात आले आहे.

अवश्य वाचा : भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, वाचा कोणत्या जागा कोणासाठी राखीव

आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू

या आरक्षणामुळे आधीपासून मोर्चे बांधणी करून ठेवणाऱ्या संभाव्य उमेदवारांची जागा महिलांसाठी राखीव झाल्यास त्यांच्यावर नवीन जागेचा शोध घेण्याची वेळ आली आहे. तसेच दिग्गज नेत्यांना पर्यायी जागेचा शोध घेण्याची वेळ आली आहे. तसेच राजकीय पक्षांकडे आजही महिला उमेदवारांची वानवा आहे. राखीव जागेसाठी विशिष्ट प्रवर्गातून महिला उमेदवारांचा शोध घेण्याची वेळ राजकीय नेत्यांसमोर आली आहे. यामुळे आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची आशा आहे. यादृष्टीने या नगरपंचायतीत राजकीय डावपेच लढविण्यास सुरुवात झाली आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)