

A family in Kojabi Chak, Nagbhid taluka, was forced to bury their relative after failing to get firewood for cremation from the forest depot.
राहुल रामटेके
तळोधी बा. : माणसाच्या आयुष्यातील शेवटचा प्रवासही सन्मानाने व्हावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र, नागभीड तालुक्यातील कोजबी चक येथे अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सरणाचे लाकूड उपलब्ध न झाल्याने एका कुटुंबावर अत्यंत वेदनादायी प्रसंग ओढवला. अखेर, नाईलाजाने जेसीबीच्या सहाय्याने स्मशानभूमीत खड्डा खोदून मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर आली.