
Summary
नागपूर-जबलपूर महामार्गावर ट्रक- मोटारसायकल अपघातात महिलेचा मृत्यू झाला.
अपघातानंतर मृतदेह पतीला मोटारसायकलला बांधून घरी न्यावा लागला; व्हिडिओ व्हायरल झाला.
AI-MARVEL सिस्टीमच्या मदतीने पोलिसांनी ट्रक चालकाला ओळखून अटक केली.
नागपूरमध्ये झालेल्या हृदयद्रावक अपघाताच्या एका आठवड्यानंतर, पोलिसांनी अखेर आरोपी ट्रक चालकाला अटक केली आहे. अपघातनंतर पतीला पत्नीचा मृतदेह मोटारसायकलला बांधून वाहून न्यावे लागले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामुळे लोकांना धक्का बसला होता. या अपघातातील ट्रक ड्रायव्हर फरार झाला होता. त्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नव्हता.