आमदार रायमूलकरांच्या वाहनाला अपघात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

खासदार प्रतापराव जाधव तातडीने दिल्लीवरुन औरंगाबाद येथे पोहोचले असून यांनी रायमूलकर यांच्या उपचारासाठी व्यवस्था केली आहे. 

बुलडाणा : मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या कारला शुक्रवारी रात्री नायगाव दत्तापूर जवळ गंभीर अपघात झाला. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नाही. वृत्त लिहिस्तोवर आमदार रायमूलकर व इतरांना उपचारासाठी मेहकरला हलविण्यात आल्याचे समजते. 

आमदार रायमूलकर हे एम.एच. 28 ए झेड. 7771 या गाडीने मतदारसंघातील एक कार्यक्रम आटोपून मेहकरकडे येत होते. नायगाव दत्तापूर नजीक रात्री 9.15 च्या सुमारास एम. एच. 28 एच 9801 हा वाळूने भरलेला 407 समोरुन भरधाव येत होता दोन्ही वाहनात जबर धडक झाली. त्यात आमदारांची गाडी पलटी झाली. आमदारांचे सुरक्षा रक्षक ज्ञानेश्‍वर निकस व ड्रायव्हर पंजाब गुडधे यांना मुका मार लागला आमदार व अन्य दोघे जखमी झाले. त्यांना प्रथम मेहकर व नंतर औरंगाबाद येथे हलविण्यात आल्याचे समजते. खासदार प्रतापराव जाधव तातडीने दिल्लीवरुन औरंगाबाद येथे पोहोचले असून यांनी रायमूलकर यांच्या उपचारासाठी व्यवस्था केली आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, accident, sanjay raymulkar, mla