जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे काम कसे चाललेय; पाहण्यासाठी आले नागपूरचे न्यायाधीश

Lonar photo.jpg
Lonar photo.jpg

लोणार (जि.बुलडाणा) : जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा विकास जलदगतीने होण्याकरिता विविध विभागाने अपेक्षित माहिती न्यायालयाकडे द्यावी जेणे करुन लोणार सरोवरचा सर्वांगीण विकास होऊन पर्यटकांचा ओढा लोणार सरोवराकडे वाढेल असे निर्देश नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. बी. सुक्रे व न्यायमूर्ती माधव जमादार यांनी प्रशासनाला दिले.

लोणार सरोवराचे जतन व संवर्धन करण्यासंदर्भात दाखल याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आराखडा सादर करून विकास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अंमलबजावणी झाली वा नाही याची पडताळणी करण्यासाठी दोन्ही न्यायमूर्ती जिल्हा न्यायाधीशांसह जिल्हा प्रशासनाला सोबत घेऊन सरोवराची पाहणी करण्यासाठी लोणार येथे आले होते. यावेळी त्यांनी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक घेतली. 

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 2009 मध्ये लोणार सरोवराचे जतन व संवर्धन करण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेनुसार संवर्धनाकरिता समितीही नेमण्यात आली. या समितीच्या माध्यमातून काय उपाययोजना करावयाच्या आहेत याचा आराखडा सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. सरोवरातील जमीन संपादित करणे, सरोवरात जात असलेले सांडपाणी रोखणे, खंडोबा तलावाचे सौंदर्यीकरण करणे, लघू पाटबंधारे विभागाकडील देऊळगाव कुंडपाळ तलावाचे पाणी सरोवरात जाते का याबाबत संशोधन करणे, सरोवर काठावर वसलेल्या झोपडपट्टीचे पुनर्वसन करणे, सुलभ शौचालय व बाथरूम बांधणे, स्मशानभूमी, कचरा व्यवस्थापन, सरोवरास चेनलिंक 

सरोवराची पाहणी
फेन्सिंग करणे, वेडीबाभूळ निर्मूलन करणे, नवीन इमारत बांधकाम, लोणार सरोवराच्या पाचशे मीटर हद्दीतील शासकीय कार्यालय स्थलांतरित करणे आदी सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. त्यानुसार कोणकोणती कामे पूर्ण झाली, अथवा कामे करण्यात आलीच नाहीत याची पाहणी करण्यासाठी 22 फेब्रुवारीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एस.बी. सुक्रे व न्यायमूर्ती माधव जमादार यांनी सरोवराची पाहणी केली. सरोवर पाहणीसोबतच धारतीर्थ, जुने रेस्टहाऊस, गुपित कमळजा, वनकुटी नीरी प्रकल्प (नबीचा खड्डा), एमटीडीसी जवळ इजेक्ट ब्लँकेटची पाहणी करण्यात आली.यानंतर न्यायमूर्तींनी तहसील कार्यालयाच्या सभागृहात यंत्रणेची बैठक घेतली. 

मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा न्यायमूर्ती खोंगल, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे, उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, समिती सदस्य प्रा. बळिराम मापारी, समितीचे सदस्य तथा प्राचार्य सुधाकर बुगदाने, प्रा. गजानन खरात, वन्यजीव विभागाचे खैरनार, एमएसआरडीसीचे भराड, पर्यटन विभागाचे वावधने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चंद्रकांत शिखरे, तहसीलदार सेपन नदाफ, नगर परिषद मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, लोणार उपमंडळ वरिष्ठ संरक्षण सहायक एच.पी. हुकरे, न.प. अभियंता अजय हाडोळे, तलाठी विजय पोफळे, वन्यजीव विभागाचे श्री.नप्ते, श्री. सरकटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com